esakal | राज्यात कहर! एका दिवसात 1230 नवे कोरोनाबाधित, तर इतके जण कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

corona

मुंबईत 20, सोलापूर शहरात 5, पुण्यात 3, ठाणे शहरात 2 आणि अमरावती जिल्हा, औरंगाबाद शहर, नांदेड शहर, रत्नागिरी व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचे निधन झाले.

राज्यात कहर! एका दिवसात 1230 नवे कोरोनाबाधित, तर इतके जण कोरोनामुक्त
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोनाच्या 1230 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या 23,401 वर गेली आहे. आणखी 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत बऱ्या झालेल्या एकूण 4786 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.

नक्की वाचा ट्रेन्सचं ऑनलाईन बुकिंग आजपासून होणार सुरु, कसं कराल ऑनलाईन बुकिंग? जाणून घ्या 

राज्यात आणखी 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मुंबईत 20, सोलापूर शहरात 5, पुण्यात 3, ठाणे शहरात 2 आणि अमरावती जिल्हा, औरंगाबाद शहर, नांदेड शहर, रत्नागिरी व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचे निधन झाले. उत्तर प्रदेशातील एका रुग्णाचा मुंबईत मृत्यू झाला. मृतांमध्ये 23 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 17 रुग्ण  60 वर्षे किंवा त्यावरील, 16 रुग्ण  40 ते 59 वयोगटातील आणि 3 रुग्ण 40 वर्षांखालील होते. या 36 मृतांपैकी 27 जणांना (75 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोविड-19 संसर्गामुळे राज्यातील बळींची संख्या आता 868 झाली आहे. 

हे ही वाचा हळूहळू उद्योग खुलण्यास सुरवात; राज्यात २५ हजार कंपन्या सुरु, सहा लाख कामगार रुजू

आतापर्यंत महत्त्वाचे

  • थ्रोट स्वॅब तपासणी : 2,18,914 
  • निगेटिव्ह : 1,93,457
  • पॉझिटिव्ह : 23,401
  • कोरोनामुक्त : 4786 
  • होम क्वारंटाईन : 2,48,301
  • संस्थात्मक क्वारंटाईन : 15,192
  • क्लस्टर कंटेनमेंट झोन : 1256 
  • सर्वेक्षण पथके : 12,027 
  • लोकसंख्येची पाहणी : 53.71 लाख

In one day, in maharashtra state got 1230 new corona positive and 587 corona free