दोन रिक्षांच्या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मुंब्रा-पनवेल महामार्गावरील प्रकार

कळवा : मुंब्रा-पनवेल महामार्गावर एका रिक्षाला मागून भरधाव येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात 60 वर्षीय नागरिकाच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता. 16) सायंकाळच्या सुमारास घडली.

हेही वाचा - वैद्यकीय शिक्षणासाठी १० वर्षांची मर्यादा

बाळाराम पाटील (60, रा. दहिसर) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. मुंब्रा-पनवेल रस्त्यावरील दहिसर येथील सुखदेव धाब्याजवळ रिक्षाचालक अब्दुल शेख हा जात होता. त्याच्या रिक्षातून बाळाराम पाटील हे शिळ फाटा येथे जात असताना रिक्षाच्या पाठीमागून येणाऱ्या रिक्षाचालक दत्तू माळी (रा. नागाव) याने अब्दुल याच्या रिक्षाला जोराने धडक दिली.

महत्त्वाची बातमी - वांद्रे किल्ल्यावरुन श्रेयाचे राजकारण सुरु

या धडकेत पुढील रिक्षा पलटी झाल्याने बाळाराम पाटील यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला; तर दोन्ही रिक्षाचालक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात शिळ-डायघर पोलिस पुढील तपास करीत आहेत. 
 

web title : one dead in riksha accident at kalwa

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in riksha accident at kalwa