मुंबईत मृत्यूचे शतक; आज मुंबईत आढळले कोरोनाचे 150 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दीड हजारावर 

मुंबई : मुंबईत कोरोनाने आतापर्यंत 100 जणांचा बळी घेतला आहे. मृतांचा आकडा वाढत असला, तरी त्यापैकी बहुतेक रुग्ण दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

मुंबईत सोमवारी 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे बळींची संख्या 100 वर गेली. त्यापैकी 7 जणांना दीर्घकालीन आजार होते, तर दोघांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याचे सांगण्यात येते. मृतांमध्ये सहा महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी 87 टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे दीर्घकालीन आजार होते; तर 8 टक्के मृत्यूंमध्ये वार्धक्‍य हे कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी घरीच थांबून काळजी घ्यावी आणि उपचार करावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. 

सावधान ! ड्रेनेज पाईपमधून कोरोना संसर्गाचा धोका ? वैज्ञानिकांचा सुरु आहे अभ्यास...

दरम्यान, सोमवारी 150 नवे कोरोनाबाधित सापडल्याने रुग्णांचा आकडा 1549 वर गेला. आणखी 259 नवे संशयित रुग्ण रुग्णालयांत दाखल झाल्यामुळे ही संख्या 4733 झाली आहे. प्रतिबंधित भागांत कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने 80 विशेष दवाखाने सुरू केले आहेत. आतापर्यंत 3085 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आणि 1185 संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले. मुंबईतील 32 हजार 645 इमारतींच्या आवारांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 

मोठी बातमी - टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू करावेत - CII, जाणून घ्या सुचवलेले 'तीन' टप्पे....

141 जण घरी परत 
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी अनेक रुग्ण बरे होत आहेत. बरे झालेल्या 43 रुग्णांना करोना सोमवारी घरी पाठवण्यात आले. आतापर्यंत 141 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

one hundred deaths of corona in mumbai 150 new positive patients found in mumbai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one hundred deaths of corona in mumbai 150 new positive patients found in mumbai