सावधान ! ड्रेनेज पाईपमधून कोरोना संसर्गाचा धोका ? वैज्ञानिकांचा सुरु आहे अभ्यास...

सावधान ! ड्रेनेज पाईपमधून कोरोना संसर्गाचा धोका ? वैज्ञानिकांचा सुरु आहे अभ्यास...

मुंबई : कोरोना व्हायरसनं जघरात हाहाकार माजवला आहे. त्यात आता कोरोना व्हायरसबद्दलच्या  नवनवीन गोष्टी वैज्ञानिकांकडून समोर येत आहेत. आता तुमच्या बाथरूमच्या पाईपलाईनमधूनही म्हणजेच ड्रेनेज लाईन मधूनही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती हॉंगकॉंगच्या एका वैज्ञानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. यावर वैज्ञानिक अभ्यास करत आहेत.

हॉंगकॉंगच्या एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दोघांना कोरोची लागण झाली. हे दोघंही वेगवेगळ्या मजल्यावर राहत होते. यात एक ६२ वर्षांची महिला तर एक ७५ वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. हॉंगकॉंगमध्ये अनेक इमारतींमध्ये अशा प्रकारे कोरोनाची  लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ही लागण बाथरूमच्या पाईपलाईनमधून होतेय की काय अशी शंका वैज्ञानिकांच्या मनात निर्माण होतेय.

वैज्ञानिक याचा अभ्यास करण्यासाठी या मुद्द्याला २००२ मध्ये आलेल्या सार्स नावाच्या रोगाशी जोडून बघत आहेत. त्यावेळी सार्सचा संसर्ग होण्याचं प्रमुख कारण म्हणजे बाथरूमची खराब पाईपलाईन हेच होतं. तसंच यामुळे ३०० लोकांना याची बाधा झाली होती तर ४२ लोकांचा मृत्यू झाला होता. याबद्दल तपासणी करण्यात आली मात्र इमारतीच्या पाईपलाईन्स सुरक्षित असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

वैज्ञानिकांनी व्यक्त केल्या शक्यता:

इमारतीतल्या ज्या दोघांना कोरोनाची लागण झाली ते दोघे एकाच इमारतीत राहत होते. मात्र त्यांच्यात १० मजल्यांचं अंतर होतं. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या दोघांना एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे, लिफ्टच्या बटन्सला हात लावल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला असावा. त्यात त्यांच्या घरातले पाण्याचे पाईपही काढण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या घरच्या सांडपणाच्या पाईपमुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला का? यावर वैज्ञानिक अभ्यास करू लागले. मात्र एका सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, हे व्हायरस लोकांच्या घरच्या खिडकी मधून किंवा एसीच्या पाईपलाईनमधून किंवा बाथरूमच्या पाईपलाईनमधून जाऊ शकतात.

बाथरूमच्या पाईपलाइनमधून कसा पसरू शकतो कोरोना?

प्रत्येक बाथरूममध्ये आणि सिंकमध्ये यु-शेपचा पाईप असतो. जो आपल्या घरात बाथरूमची दुर्गंधु येण्यापासून थांबवत असतो. यामध्ये सतत पाणी साचलेले असतं. त्यामुळे त्याला यु-ट्रॅप ही म्हंटलं जातं. हे पाईप एका मोठ्या पाईपला जोडून सरळ जमिनीत गाडले असतात. त्यालाच जोडून एक व्हेन्ट पाईप असतो. जो या सांडपाण्याला आणि दुर्गंधीला दूर करून सॉईल पाईपमधलं प्रेशर टिकवून ठेवण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे हा सॉईल पाईप सर्व मजल्यांवरच्या सर्व घरांच्या बाथरूमला जोडला गेला असतो.
 
मात्र ही पाईपलाईन इतर सर्व घरांच्या बाथरूमशी जोडली गेली असल्यामुळे हे व्हायरस पाईपलाईन मधून आपल्या बाथरूमच्या यु-शेप पाईपमध्ये येऊन जमा होतात आणि यामुळे संसर्ग वाऱ्यासारखा पसरतो. २००२ साली आलेल्या सार्सच्या वेळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र काही वैद्यानिकांच्या म्हणण्यानुसार, सार्स हा व्हायरस हवेतून पसरत होता. त्यामुळे तो कोरोनापेक्षा भयंकर होता. म्हणून त्याचा फैलाव बाथरूमच्या पाईपच्या माध्यमातून झाला होता.

मात्र इतरांना कशी होऊ शकते लागण:

या व्हेन्ट पाईपमधून कोरोनाचा संसर्ग कसा झाला याचा शोध वैज्ञानिकांकडून घेतला जातोय. मात्र  हॉंगकॉंगच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार  पाईपलाईन खराब असल्यामुळेच या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. "कोरोनाचे विषाणू असलेलं पाणी किंवा इतर काही गोष्टी आधी कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णाच्या घरच्या बाथरूममधून खाली आलं असावं आणि ते खराब पाईपलाईनमुळे  किंवा दूषित हवेमुळे घरात जाऊन इतरांना संसर्ग झाला असावा असं  हॉंगकॉंगच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मत आहे.

मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून हॉंगकॉंगच्या प्रशासनाकडून लोकांना सतत आपल्या सांडपाण्याच्या पाईपलाईन दुरुस्त करण्याचा किंवा यु-शेप पाईपची सतत स्वच्छता करण्याचं आणि  बाथरूममध्ये गेल्यानंतर आधी फ्लूसह करण्याचा सल्ला देत आहे. दरम्यान हा व्हायरस खरंच  पाईपलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पसरतो का यावर अजूनही वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. मात्र जर असं असेल तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात असलेल्या आपल्या सर्वाचीच चिंता वाढवणारी ही  गोष्ट ठरेल हे नक्की.

are drainage pipelines becoming reason behind corona spread read full report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com