Mhada house
Mhada house ESakal

Mhada Application: म्हाडाच्या घरांना मोठा प्रतिसाद! अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ, ५ हजार घरांसाठी दीड लाखहून अधिक अर्ज

Mhada Konkan Board House Lottery: म्हाडाच्या कोकण मंडळाने पाच हजार २८५ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीकरिता जुलैमध्ये लॉटरी जाहीर केली होती. त्या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल एक लाख ७९ हजार ८१४ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी एक लाख ४४ हजार ९३४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केला आहे. आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्याने ९ ऑक्टोबरला लाॅटरीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या पाच हजार २८५ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीकरिता जुलैमध्ये लॉटरी जाहीर केली होती. त्यानुसार १४ जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने दोन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

Mhada house
Mumbai News: खड्ड्यांप्रकरणी भरपाई देण्यास तयार राहा, उच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिका धारेवर

सोमवारपर्यंत अनामत रक्कम भरता येणार

म्हाडाच्या घरासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या अर्जदारांना उद्या शनिवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करता येणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.

२२ सप्टेंबरला प्रारूप यादी

  • सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २२ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

  • २४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.

  • सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी ७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

  • ९ ऑक्टोबरला ठाणे येथे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय लॉटरी काढली जाईल.

Mhada house
पिण्याच्या पाण्याची पहिली प्लास्टिकची बाटली कधी तयार केली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com