200 कोटींची फसवणूक, एचडीआयएलविरोधात आणखी एक गुन्हा दाखल   

200 कोटींची फसवणूक, एचडीआयएलविरोधात आणखी एक गुन्हा दाखल   

मुंबई : भांडुप येथील प्रकल्पात 400 ग्राहकांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडचे (एचडीआयएल) प्रवर्तक राकेश व सारंग वाधवान यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. भांडुप येथील मॅजेस्टिक टॉवरशी संबंधित हे प्रकरण असून, आर्थिक गुन्हे शाखेचा गृहनिर्माण कक्ष पुढील तपास करत आहे.

भांडुप येथील मॅजेस्टिक टॉवरमधील सदनिका मालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष चंद्रकिशोर कोलिंदीवाला (69) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 2010 मध्ये वृत्तपत्रांतील जाहिरातीवरून या प्रकल्पाची माहिती मिळाली. त्यानुसार टूर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या कोलिंदीवाला यांनी एचडीआयएलच्या कार्यालयात जाऊन प्रकल्पाची माहिती घेतली. त्यांनी या इमारतीच्या 19 व्या मजल्यावरील थ्री-बीएचके सदनिका 86 लाख 36 हजार रुपयांना खरेदी केली. त्यानंतर 17 ऑक्‍टोबर 2013 रोजी त्या फ्लॅटबाबत "सेल डीड' तयार करण्यात आले. त्या करारानुसार 2013 च्या अखेरपर्यंत फ्लॅट ताब्यात देण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आले होते. 

त्यांनी वेगवेगळ्या वेळी एकूण 81 लाख रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दिले; परंतु 2013 उलटल्यानंतरही त्यांना घराचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता मजुरांची अनुपलब्धता, मालाची कमतरता अशी कारणे देण्यात आली. त्यानंतर कोलिंदीवाला यांनी घरे खरेदी करणाऱ्या अन्य व्यक्तींची माहिती घेतली. 

या सर्वांनी मे 2019 मध्ये महारेराकडे तक्रार केली. पुढे एचडीआयएलने बुडित प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगून प्रकरण बंद केले. त्यानंतर तक्रारदारांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

one more scam of 200 crore one more case registered against HDIL

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com