घरात गाढ झोपेत असताना मलंग गडावरील दरड कोसळून एकाचा मृत्यू; दीड वर्षाच्या चिमुरड्याला वाचवण्यात यश, पत्नीसह मुलगा गंभीर

पावसास सुरुवात झाली की, अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील श्री मलंगगडावरील गावकऱ्यांवर दरडीचे सावट कायम घोंगावत असते.
Malanggad
Malanggadesakal
Summary

मलंगगडाच्या डोंगरावर अनधिकृत लोकवस्ती वाढत असून या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात.

डोंबिवली : श्री मलंगगड पट्ट्यात (Malanggad) पावसाला सुरुवात झाली आणि पहिल्याच पावसात दरड घरावर कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. गुलाम सय्यद (वय 30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सकाळी 6 च्या दरम्यान सर्वजण घरात गाढ झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. गुलाम हे आपल्या दीड वर्षाच्या मुलाला या अपघातातून वाचविण्यात यशस्वी झाले, मात्र त्यांना यात जीव गमवावा लागला आहे.

त्यांची पत्नी समिरा व मुलगा हे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उल्हासनगर (Ulhasnagar) येथे उपचार सुरु आहेत. पावसास सुरुवात झाली की, अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील श्री मलंगगडावरील गावकऱ्यांवर दरडीचे सावट कायम घोंगावत असते. मागील वर्षीच्या पावसाळ्यात देखील येथे दरड कोसळून एका घराचे नुकसान झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी जेथे जेथे दगड खाली येण्याचा धोका आहे त्या ठिकाणी मोठी ताडपत्री, प्लास्टिकचे कागद लावून ते झाकून ठेवले होते.

Malanggad
Murlidhar Mohol : पुण्याच्या खासदाराने कोल्हापुरात गिरविले कुस्तीचे धडे; केंद्रीय मंत्रिमंडळात मोहोळ यांच्या रूपाने राज्याचा पहिला मल्ल

दरवर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळून दुर्घटना होत असताना देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मलंगगड पट्ट्यात पावसास सुरुवात झाली असून यंदाच्या पहिल्याच पावसात मलंगगडावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून यात गुलाम यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांची पत्नी व मुलावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. मलंगगडाच्या डोंगरावर अनधिकृत लोकवस्ती वाढत असून या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात. तरीही नागरिक आपला जीव धोक्यात घालून येथे वास्तव्यास राहतात. वन विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी वन विभागाने या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, मात्र त्या तोडक कारवाईमुळे आज एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

Malanggad
जयभीम नगरातील झोपड्यांवर मुंबई महानगरपालिकेचा 'बुलडोझर'; भरपावसात भिजत रहिवाशांना काढावी लागली रात्र

स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार, सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यातील मृत गुलाम हे आपल्या मुलाचा जीव वाचवायला गेले, मुलाचा जीव वाचला मात्र त्यांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. मलंगगड डोंगराच्या मागच्या बाजूला काही दिवसांपूर्वी जेएनपीटी - वडोदरा महामार्गच्या टनलचे काम चालू असताना तेथे ब्लास्टिंग करण्यात आले होते. त्या ब्लास्टिंगचे हादरे डोंगराला बसले आहेत. त्यामुळेच सोमवारी गुलाम यांच्या घरावर दरड कोसळण्याची घटना घडली असे गावकऱ्यांनी सांगितले. प्रशासन येथील वाढते अनधिकृत बांधकाम, वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक आपला जीव धोक्यात घालून येथे वास्तव्य करत जीवाला मुकत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com