जयभीम नगरातील झोपड्यांवर मुंबई महानगरपालिकेचा 'बुलडोझर'; भरपावसात भिजत रहिवाशांना काढावी लागली रात्र

6 जूनला पालिकेने या वस्तीवर बुलडोझर फिरविला होता. यावेळी परिणामी संतप्त रहिवाशांनी दगडफेक केली.
Jaibhim Nagar Hiranandani
Jaibhim Nagar Hiranandaniesakal
Summary

आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार नसीम खान तर खासदार वर्षा गायकवाड अन्य नेत्यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

मुंबई : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पवई येथील हिरानंदानी परिसरातील जयभीम नगरातील (Jai Bhim Nagar) झोपड्यावर मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) बुलडोझर चालवून घरे जमीनदोस्त केली होती. या कारवाईमुळे बेघर झालेल्या रहिवाशी फुटपाथवर आले आहेत. गेल्या दोन रात्री या रहिवाशांना भर पावसात भिजत काढावी लागली आहे.

पवई येथील हिरानंदानी (Hiranandani) परिसरातील प्रशासनाच्या चार एकर जागेवर एकूण 600 ते 700 घर धारक गेले 30 वर्षापासून राहत होते. या परिसरातील स्केवर फूट जागेला कोटींचा भाव आहे. विकासकाचा या जागेवर कित्येक दिवसापासून डोळा होता. 6 जूनला पालिकेने या वस्तीवर बुलडोझर फिरविला होता. यावेळी परिणामी संतप्त रहिवाशांनी दगडफेक केली, तर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या दोन्ही घटनेत 5 पोलीस कर्मचारी तर, काही रहिवाशी जखमी झाले होते.

Jaibhim Nagar Hiranandani
तब्बल 400 वर्षांपूर्वीचा यल्लमा मंदिराजवळचा वटवृक्ष उन्मळून पडला; या वृक्षासाठी झाली आंदोलनं, ठाकरे-गडकरींनीही घेतली होती दखल

सध्या बेघर झालेल्या रहिवाशांना डोक्यावर कोणताही निवारा नाही. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून भर पावसाळ्यात उघड्यावर भिजत राहण्याची वेळ आली आहे. जयभीम नगरमधील सर्व रहिवाशांचे त्वरित पुनर्वसन करा, आमच्या जमिनीवर घरांची पुनर्बांधणी करा, पालिका व पोलिसांनी केलेल्या नुकसानीची भरपाई द्या, अटक केलेल्या सर्वांवरील खटले मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करा. पोलीस, विकासक व बाऊन्सर यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी जन हक्क संघर्ष समिती व जयभीम नगर रहिवाशी बचाव समिती व अन्य सामाजिक संघटनांनी पालिकेला केली आहे.

Jaibhim Nagar Hiranandani
Chandoli National Park : चांदोली उद्यानात आढळली आक्रमक होणारी सर्वभक्षक 8 अस्वले; काय आहेत या अस्वलांची वैशिष्ट्ये?

याबाबत जिल्हाधिकारी मुबंई उपनगर, वांद्रे तहसीलदार, सहा आयुक्त पालिका एस विभाग, पोलीस उपायुक्त, मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना पत्राव्यवहार ही केला आहे. समितीचे पदाधिकारी अन्य सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या वतीने रविवारी मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तर, रहिवाशांना पोलिसांनी मारहाण केली होती. तसेच ते भयभीत झाले होते. त्यामुळे मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार नसीम खान तर खासदार वर्षा गायकवाड अन्य नेत्यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. आमचे पूनर्वसन होईपर्यंत आम्ही लढा देतंच राहू मात्र पालिका पोलीस, विकासक व बाऊन्सर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

Jaibhim Nagar Hiranandani
School Uniform : विद्यार्थी गणवेशापासून राहणार वंचित; शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याचे नियोजन ढासळले, काय आहे कारण?

न्यायालयाचा आदेश असताना पावसाळ्यात पालिकेने कारवाई करणे योग्य नाही. त्यांना बेघर केले आहे. त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे. प्रशासनाने आमच्या नियोजित मोर्चाला परवानगी नाकारली. मात्र, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत मोर्चा काढणार आहे.

-संजना क्रिष्णन, जन हक्क संघर्ष समिती

विकासक, पालिका व पोलिसांनी यांनी आमच्यावर अन्याय केला आहे. आमची घरे उद्ध्वस्त करून आम्हाला फुटपाथवर आणले आहे. त्यामुळे आम्हाला गेले चार दिवसांपासून पावसात भिजत रात्र काढावी लागत आहे. न्यायालयात न्याय मिळेपर्यंत आम्ही फुटपाथवरचं राहणार आहे. पावसाळ्यात आम्हाला बेघर करायचं नव्हतं. विकासक महात्मा फुले नगर परिसरात जागा देणार आहे. याची कल्पना नाही. आम्हाला याच ठिकाणी घरे दिली पाहिजेत.

-शांताबाई मानकर, बेघर महिला

घर पाडली गेली आणि घरांबरोबर शाळेत लागणारी महत्वाची कागद पत्र ही त्यात हरवले गेले. शाळेत कसं जायचं आणि कुठं राहायचा मला कळत नाही. आई-बाबा ज्या ठिकाणी रहायला घेऊन जातील तिकडे जाणार आहे. अन्यथा उघड्यावर रहायला लागले तरी राहू.

-संध्या जोगदंड, विद्यार्थिनी

पुढारी येतात, आमदार सांगतो मी विकासकाबरोबर बोलणी केली आहे. घर देण्यात येणार आहे. फुले नगरला जागा दाखविली आहे. कोणीही काही सांगतो, मात्र त्याच्यावर विश्वास नाही. मायबाप सरकार लक्ष देत नाही, मात्र काही सामाजिक संघटना आमच्या करिता लढा देत आहेत.

-शोभा वहाळ, बेघर

पालिका, विकासक व पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नाही. न्यायालय परिपत्रक नियम व आचार संहिता नियमांचे उल्लंघन केले आहे. यांच्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे व बेघरांना घर मिळाले पाहिजे. या करिता ते पालिका एस विभाग सहा आयुक्त यांची भेट घेणार आहे.

-वर्षा गायकवाड, खासदार, कॉंग्रेस

हिरानंदानी बिल्डरच्या अधिकाऱ्यांसह जयभीम नगर मधील रहिवाशांची बैठक घेतली आहे. या वेळी विकासकामाच्या मालकीच्या जमिनीवर यांना हक्काचे घरे देण्यात यावी, अशी मागणी केली. या वेळी त्यांना तीन जागांचे पर्याय देण्यात आले असून लवकरच यातील जी जागा स्थानिकांना पसंत होईल तिथे नव्याने जयभीम नगर वसाहत उभारण्यात येणार आहे.

-दिलीप लांडे, आमदार शिवसेना (शिंदे गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com