
Mumbai Fire Accident : अग्नितांडव! कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू
मुंबई आज पुन्हा भीषण आगाची घटना घडली आहे. कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे इमारतीतील 6 मजले आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. या भीषण आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही भीषण आग विझवण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गजबलेल्या कुर्ला भागामध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक इमारतीला आग लागली आहे.
भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीची चौथ्या मजल्यावर आग लागली होती. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. इमारतीच्या 10 व्या मजल्यापर्यंत आगीचे लोन पसरले आहे. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
तर दोन दिवसांपूर्वीच मालाड परिसरात एका झोपडपट्टीमध्ये भीषण आगीची घटना घडली होती. आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक 15 सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये एका 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर आगीत 10 ते 15 झोपडीधारक जखमी झाले. या आगीमध्ये 50 पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.