
मुंबई, ता. 15 लॉकडाउनच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास येत असलेल्या अडचणी पाहून वन रुपी क्लीनिकतर्फे डॉक्टर तुमच्या घरी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत वन रुपी क्लिनिकतर्फे मुंबईत चार गाड्या तैनात केल्या जातील. त्यात डॉक्टर सर्व साधनसामुग्रीसह सज्ज असतील. या व्हॅनमधील पथक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी येऊन त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करणे, आरोग्य तपासणी करणे आदी कामे करतील.
कोरोनाच्या फैलावामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास मोठी अडचण झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टर साधा ताप असलेल्या रुग्णांच्या घरीही येण्यास तयार नाहीत. ही अडचण सोडवण्यासाठी वन रुपी क्लिनिक तर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या घरी येऊन रास्त दरात औषधोपचार, चाचण्या ओपिडी आदी उपचार करण्याचं ठरवलं आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरासाठी एक गाडी, दक्षिण मुंबईसाठी एक गाडी, पश्चिम उपनगरासाठी दोन गाड्या या कामाकरता वन रुपी क्लिनिकतर्फे तैनात केल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांची घरच्या घरी शुगर टेस्ट, ब्लडटेस्ट, कोरोना चाचणी, इसीजी, ड्रेसिंग ओपीडी कन्सलटेशन, आदी कामे केली जातील. विटामिन बी 12 किंवा धनुर्वाताचे इंजेक्शन आदी उपचारही ह्या डॉक्टरांतर्फे केले जातील. कोरोनाच्या काळात आपल्याला जीवनपद्धतीत चांगलाच बदल करावा लागणार आहे.
त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या उपचारांना जास्त महत्त्व येत आहे. त्यानुसार आम्ही आता आमच्या कार्यपद्धतीत बदल करत आहोत, असे वन रुपी क्लीनिक संचालक राहुल घुले यांनी सकाळ'ला सांगितले.
one rupee clinic to start giving home treatment for senior citizens in mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.