esakal | उदरनिर्वाहासाठी त्यांनी आपल्या ज्वेलर्सच्या दुकानात विकले चक्क कांदे
sakal

बोलून बातमी शोधा

पाली : येथील सराफाच्या दुकानात विकण्यासाठी ठेवलेले कांदे.

उदरनिर्वाहासाठी पर्याय; कोरोनामुळे सराफ व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

उदरनिर्वाहासाठी त्यांनी आपल्या ज्वेलर्सच्या दुकानात विकले चक्क कांदे

sakal_logo
By
अमित गवळे

पाली : कोरोनाचे ओढवलेले संकट आणि लॉकडाऊनमुळे सणासुदीचे व लग्नसराईचा निघून गेलेला हंगाम.., आणि सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले भाव.., यामुळे सराफ व्यापाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अखेर काहीतरी उदरनिर्वाह चालावा यासाठी पालीतील एका सराफ व्यापाऱ्याने आपल्या ज्वेलरच्या दुकानात चक्क होलसेल भावात कांदे विकायला ठेवले आहेत.

एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; असे असेल वेळापत्रक!

सद्यघडीला सोन्याचा भाव जवळपास 47 हजार प्रती तोळे, तर चांदीचा भाव 45 हजार प्रती किलो आहे. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीय व लग्नसराईमध्ये सोन्याच्या खरेदीला वेग येतो. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत. त्यामुळे अनेकांनी लग्ने पुढे ढकलली. तर सणासुदीला कोणी दागदागिन्यांची खरेदी केलीच नाही. त्यात सोन्याचे भाव प्रचंड वधारलेले आहेत. यामुळे सराफांवर मोठे संकट कोसळले आहे. 
अखेर उत्पन्नाचे साधन गेल्यावर करावे काय? या चिंतेपोटी येथील ज्वेलर्स दुकान मालक रवी ओसवाल यांनी आपल्या ज्वेलर्स दुकानात चक्क कांदे भरून ठेवले असून ते होलसेल भावाने विकत आहेत. 

कोरोना लढ्यात भारतावर मोठी जबाबदारी; डॉ. हर्षवर्धन डब्ल्यूएचओ कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी 

कमी भावाने ज्यांनी बुकिंग केली होती, त्यांना आता त्याच भावात दागिने द्यावे लागतील. मात्र, आम्हाला सोने चढ्या दराने खरेदी करावे लागेल. म्हणजे नुकसानच सोसावे लागणार आहे.
- हितेश राठोड,
हितेश ज्वेलर्सचे मालक 

सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यात दोन महिने दुकान बंद, ही परिस्थिती कधी बदलेल याचा अंदाज नाही. अखेर उदरनिर्वाहासाठी दुकानात कांदे विकण्यास ठेवले आहे. 
- रवी ओसवाल
, ज्वेलर्स मालक, पाली

खूप नुकसान सोसावे लागत आहे. उत्पन्नाचे साधन मिळवण्यासाठी आम्ही देखील काही दिवसांनी आमच्या ज्वेलर्स दुकानात आंबे व फळेविक्री करण्याच्या विचारात आहोत.
- स्वप्नील (पपू) ओसवाल,
ज्वेलर्स मालक, पाली

Onions sold in jwellers shops