
मुंबई : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ई-संजीवनी हा केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा संयुक्त उपक्रम असून, रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑनलाईन ओपीडी सकाळी 9. 30 ते दुपारी 1.30 या काळात सुरू राहील; मात्र रविवारी उपलब्ध नसेल. टप्प्याटप्प्याने या ऑनलाईन बाह्य रुग्ण विभागाची वेळ वाढवण्यात येईल, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नांदेड, भंडारा, नाशिक जिल्हा रुग्णालयांतील 16 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर असलेली ही सेवा आता पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. आतापर्यंत 400 हून अधिक रुग्णांना या सेवेमार्फत आरोग्य सल्ला देण्यात आला आहे.
या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतो. संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईलचा वापर करून कुठल्याही आजारावरील उपचारांबाबत सल्लामसलत करू शकतो. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, संदेशाद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करता येते.
अशी वापरता येईल सेवा :
Online OPD now in the state, Citizens will receive health advice during the lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.