Crime News : ऑनलाईन खरेदी विक्रीचे सायबर गुन्हेगारीचे आंतरराज्यीय रॅकेट सायबर पोलीसांकडून उध्वस्त

ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर खरेदी विक्री करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगार टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Cyber Crime
Cyber CrimeSakal
Summary

ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर खरेदी विक्री करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगार टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

मुंबई - ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर खरेदी विक्री करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगार टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईच्या सायबर सेलने राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यातून चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 लाख रोख रक्कम, 9 मोबाईल फोन, 32 डेबिट कार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओएलेक्स या ऑनलाईन वेबसाईटवरून फसवणूक झालेल्या काही तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन सायबर सेलने याबाबतचा तपास सुरू केला. त्यासाठी सायबर पोलिसांची काही पथके देखील तयार करण्यात आली. पोलिसांनी मुंबईतील 10 गुन्हे तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथील चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आतापर्यंत शेकडो लोकांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

या प्रकरणात मुख्य तक्रारदार व्यक्तीने फर्निचर विक्रीसाठी ओलएलएक्स वर जाहीरात दिली होती. या जाहिरातीचा फायदा घेऊन आरोपींनी तक्रादाराची फसवणूक केली. त्यानंतर सबंधितांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत कसून तपास केल्यानंतर आरोपींबाबत धागेदोरे हाती लागले.

खोलात जाऊन तपास केल्यानंतर फसवणूक करणारे आरोपी हे राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने दोन्ही राज्यांतून चार आरोपींना बेड्या ठोकल्या.या टोळीसोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? फसवणूक सोडून आणखी काही गुन्हे या टोळीने केले आहेत का? याचा देखील पोलिस कसून तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com