
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि प्लाझ्मा दान शिबिरे घेतली आहेत. मात्र, या आरोग्य सेवेत काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ नागरिकांना मानसिक संतुलन सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. मंडळाने नागरिकांसाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे, अनेकांच्या हाताला काम नाही. अनेक नागरिकांच्या या काळात नोकर्या गेल्या आहेत. रोजचे जिवन कसे जगावे असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. त्यामुळे, नागरिकांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत उपयुक्त ठरते.
त्यामुळे, यंदा कोरोनाचे संकट बघता काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाने रक्तदान शिबिराबरोबरच आता नागरिकांसाठी ऑनलाईन मानसोपचार कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये नागरिकांना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे मानसिक संतुलन सुधारण्यात मदत होणार आहे, अशी माहिती काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडून देण्यात आली आहे.
मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची नि:शुल्क कार्यशाळा -
मंडळाकडून मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा नि:शुल्क असणार आहे. या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी अगोदर काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडे नोंदणी करायची आहे. ही संपूर्ण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा ऑनलाईन असणार आहे. प्रत्येक कार्यशाळेत सहभागी होणार्या नागरिकांना पासवर्ड आणि युजर आयडी मंडळाकडून देण्यात येणार आहे. एका कार्यशाळेत जवळपास 300 नागरिकांचा समावेश असेल. तसेच, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांच्या उपचारासंबंधी सल्ले सुध्दा देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विजय लिपारे यांनी सांगितले आहे.
विविध शिबिरांचे आयोजन -
मंडळाकडून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 181 नागरिकांनी रक्तदान केले आहे. तसेच काळाचौकीच्या महागणपती कार्यालयात प्राथमिक आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. आरोग्य शिबिरांबरोबरच विविध आजारांच्या चाचण्या, मोफत औषध वाटप तसेच महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिरही मंडळाच्या वतीने आयोजित केले जात आहे. तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 3 लाख 2 हजार 660 रुपये निधी देण्यात आला आहे.
( संकलन - सुमित बागुल )
online workshop free of cost by ganeshotsav pandal in mumbai read full news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.