चिंताजनक ! राज्यात रक्ताचा तुटवडा, काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाग्रस्तांना उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली, तरी ॲनिमिया किंवा तत्सम आजार असल्यास रक्ताची आवश्यकता भासू शकते. मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूती आणि काही कॅन्सरसारख्या आजारातही रक्ताची आवश्यकता असते.

मुंबई : राज्यात  आठ ते 10 दिवस पुरेल एवढा  रक्तसाठा असून, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अन्न  व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिगणे यांनी केले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तसाठा, पीपीई किट, मास्क यांच्या पुरवठ्याबाबत माहिती घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मोठी बातमी : कोविडचा सामना करण्यासाठी सरकारकडून जम्बो सुविधा केंद्राचा निर्णय...

कोरोनाग्रस्तांना उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली, तरी ॲनिमिया किंवा तत्सम आजार असल्यास रक्ताची आवश्यकता भासू शकते. मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूती आणि काही कॅन्सरसारख्या आजारातही रक्ताची आवश्यकता असते. राज्यातील सर्व ब्लड बँकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून वेळोवेळी  माहिती घेतली जाते. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्या, सामाजिक संस्था यांनीही रक्तदान शिबिरे घ्यावीत. त्यासाठी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले. 

नक्की वाचा अतिहुशारपणाचा कळस ! सोसायटीत रंगली चक्क 'समोसा' पार्टी, मग पोलिसांनी....

खासगी  डॉक्टरांना पीपीई किट 
खासगी डॉक्टरांनी अन्य आजारांच्या रुग्णांसाठी दवाखाने सुरू करावेत, असे आवाहन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील किमान 10 औषध दुकानांत पीपीई किट आणि एन- 95 मास्क विक्रीसाठी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन प्लाझ्मा थेरपीसाठी  केंद्राकडून केवळ दोन दिवसांत सर्व परवानग्या मिळवून दिल्या, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल रक्तपेढी चालकांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.

 

Only 10 days blood supply in the state Information of the Minister of Food and Drug Administration


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 10 days blood supply in the state Information of the Minister of Food and Drug Administration