कोरोनाची रुग्णवाहिकांचालकांमध्‍ये दहशत ! मुंबईत फक्‍त 400 वाहने रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा धसका रुग्णवाहिकाचालकांनी घेतला आहे. बहुतांश चालकांनी रुग्णवाहिका बंदच ठेवल्या आहेत. अत्यावश्‍यक सेवेमधील 3 हजारांपैकी फक्‍त 400 रुग्णवाहिका रस्त्यावर असल्याचे सांगण्यात येते. मुंबईत साथरोगांचा कहर सुरु असल्याच्या काळातही परिस्थिती उद्‌भवल्यामुळे त्याचा फटका अनेक रुग्णांना बसत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांअभावी रुग्णांची फरफट सुरूच आहे. 

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा धसका रुग्णवाहिकाचालकांनी घेतला आहे. बहुतांश चालकांनी रुग्णवाहिका बंदच ठेवल्या आहेत. अत्यावश्‍यक सेवेमधील 3 हजारांपैकी फक्‍त 400 रुग्णवाहिका रस्त्यावर असल्याचे सांगण्यात येते. मुंबईत साथरोगांचा कहर सुरु असल्याच्या काळातही परिस्थिती उद्‌भवल्यामुळे त्याचा फटका अनेक रुग्णांना बसत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांअभावी रुग्णांची फरफट सुरूच आहे.

चांगली बातमी : कोरोनामुक्‍त ज्‍येष्‍ठ नागरिकाचे अनोखे स्‍वागत!

रुग्णवाहिका ही अत्यावश्‍यक सेवा मानली जाते. मुंबईत सरकारी तसेच खासगी मिळून एकूण 3 हजारांवर रुग्णवाहिका आहेत. यातील 300 खासगी रुग्णवाहिका सुरु असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. तसेच 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका 93 सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील बहुतांश रुग्णालयांबाहेर रांगेत उभ्या असलेल्या रुग्णवाहिका दिसेनाशा झाल्या आहेत.

कोरोनाच्या भीतीने काही चालक रुग्णवाहिका रस्त्यावर काढत नाहीत. तसेच, खासगी रुग्णवाहिकाचालक पोलिस परवानगी देत नसल्याचे कारण पुढे करत आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकांची कमतरता भासत आहे. घाटकोपरमधील जखमी तरुणाला रुग्णालयात जायचे होते. त्याने रुग्णवाहिका चालकांशी संपर्क साधला होता; मात्र चालकाने आम्ही सेवेत नसल्याचे त्यांनी कारण दिले. अखेर त्या तरुणाने मित्राच्या वाहनाने रुग्णालय गाठले. त्यामुळे रुग्णवाहिकेशिवाय रुग्णांची फरफट होत आहे.

मोठी बातमी : महाराष्‍ट्रात सरकार विरुध्‍द राज्‍यपाल असा नवा संघर्ष सुरु होण्‍याचे संकेत  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्‍यक सेवांना प्रशासनाने मुभा दिली आहे. मुंबईत 3 हजार रुग्णवाहिकांपैकी फक्त 100 रुग्णवाहिका आहेत. रुग्णवाहिकेअभावी अनेकांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी ऑटो रिक्षा, इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. 

लॉकडाऊनमुळे रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवले आहे. या प्रश्‍नी सरकारने तत्काळ तोडगा काढावा. 
- किरीट सोमय्या, माजी खासदार, भाजप 

लॉकडाऊनमुळे चालक नसल्याने रुग्णवाहिका असूनही सेवा देणे शक्‍य होत नाही. शिवाय, परवानग्या घेण्यासाठी ही वेळ जात आहे. त्याचा परिणाम रुग्णवाहिका सेवेवर झाला आहे. 
- सिद्धेश पाटील, स्पंदन, रुग्णवाहिका सेवा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 400 ambulances on the road in Mumbai