ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात अवघे 45 रुग्णांवर उपचार सुरु

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात अवघे 45 रुग्णांवर उपचार सुरु
Updated on

मुंबईः  ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ, त्यात जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खाटांची अपुरी पडणारी संख्या यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ होत होती. त्यात सुरुवातीच्या काळात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढत्या संख्येमुळे खाटांची अपूऱ्या संख्येमुळे जमिनीवर गादया टाकून रुग्णांवर उपचार करून त्यांना सुखरूप स्वगृही परतले आहे. 

आता जिल्ह्यातील सामान्य रुग्णांसाठी आधारवड बनलेल्या या जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे अवघे 45 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत दोन हजार 977 रुग्णांनी यशस्वी मात केली आहे. येथील उपचार पद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्णांना औषधोपचारासह मिळणाऱ्या सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड 19 रुग्णालयात करण्यात आलेले रुपांतर, यामुळे या रुग्णालयात केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना या आजाराचा मोठ्या प्रमाणत प्रादुर्भाव वाढत गेल्याने शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये खाटांच्या संख्या अपूऱ्या पडू लागल्या होत्या.

त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागले होते. त्यामुळे या रुग्णालयाच्या आवारात कंटेनरमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मिळणारी आपुलकीची वागणूक योग्य उपचार पद्धती यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यात  जिल्ह्यात रोजच सरासरी 1500 कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या जिल्ह्यातील सामान्य-गरीब रुग्णांसाठी सर्वसामान्य रुग्णालय हाच एक मोठा आधार आहे. शिवाय या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि येथील उपचारासाठी मिळणाऱ्या सोयी-सुविधा पाहून अनेक सेलिब्रिटी आणि अधिकाऱ्यांनी देखील या रुग्णालयाला पसंती दिली होती. 

एकीकडे सरकारी रुग्णालयांवरही अनेकांचा विश्वास नसताना ठाणे जिल्ह्याच्या सर्वसामान्य रुग्णालयाने मात्र, याला छेद देण्याचे काम केले आहे. येथे दाखल झालेल्या कोरोना रुग्णांसाठी हे रुग्णालय वरदान ठरले आहे. सकस आहारापासून रुग्णांच्या करमणुकीसाठी संगीतापर्यंत सगळ्या सुविधा येथे देण्यात येत आहेत. परिणामी इतर रुग्णांच्या मानाने या रुग्णालयाचा रिकव्हरी दर फारच चांगला आहे.

दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात 200 खाटांची सुविधा आहे. त्यात 150 अतिदक्षता आणि 50 जनरल कोरोना बाधित रुग्णांच्या खाटांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वच महानगर पालिकेने कोरोनाचे रुग्णालय चालविले आहे. ग्रामीण भागातही उप आरोग्य केंद्रांच्या मदतीने कोविड केअर सेंटर उघडण्यात आले आहेत. मात्र गंभीरवस्थेत असलेले कोरोनाचे रुग्ण सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केली जातात. 

हे रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोना रुग्णाची काळजी घेत आहेत. सध्या येथे अवघ्या 45 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाने आतापर्यंत कोरोना उपचारासाठी येथे दाखल झालेल्या 3 हजार 503 रुग्णांपैकी तब्बल 1 हजार 727 कोरोना रुग्णांना ठणठणीत बरे केले आहे. तर 1 हजार 236 रूग्णांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले असून काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

---------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Only 45 patients are being treated at Thane District General Hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com