esakal | मुंबईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! धारावीतून आली दिलासादायक बातमी...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! धारावीतून आली दिलासादायक बातमी...

धारावीत मंगळवारी कोरोनाच्या केवळ एका नवीन रुग्णाची नोंद झाल्यामुळे एकूण संख्या 2335 वर पोहोचली.

मुंबईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! धारावीतून आली दिलासादायक बातमी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई  : मुंबई शहरात कोरोनाचे थैमान अजूनही शमलेले नाही. वरळी, धारावी सारख्या परिसरामघ्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणवर नागरीकांना संसर्ग झाला. त्यामुळे वरळी, धारावी परिसर कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट बनले होते. दाट वस्तीचा प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी कोरोना जास्त फैलावला होता. परंतु धारावीतूनच आता मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.  धारावीत मंगळवारी कोरोनाच्या केवळ एका नवीन रुग्णाची नोंद झाल्यामुळे एकूण संख्या 2335 वर पोहोचली. जी उत्तर विभागात दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. या विभागात 1056 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

UGC च्या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक, उचलणार 'हे' मोठं पाऊल..

धारावीत मंगळवारी कोव्हिड-19चा फक्त एक नवीन रुग्ण आढळला आणि एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या 2335 झाली असून, मृतांचा आकडा 81 वर स्थिर आहे. दादरमध्ये 20 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 1004 वर गेली. आतापर्यंत 16 रुग्ण दगावले आहेत. माहीममध्ये 11 नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण संख्या 1275 झाली. मृतांचा आकडा 14 आहे.

'म मनाचा, म मराठीचा'; खास मराठीसाठी येतोय नवा ओटीटी प्लॅटफॉर्म...

धारावी-दादर-माहीम या तीनही परिसरांत दिवसभरात 32 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 4614 वर गेली आहे. आतापर्यंत 111 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. आतापर्यंत दादरमधील 622, माहीममधील 850 आणि धारावीतील 1735 असे एकूण 3207 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

loading image