प्रेमात 'धोका' मिळाल्यावर 'अशी' रिऍक्ट करतेय तरुणाई, जाणून घ्या काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्स...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

सध्याच्या युगात तरुणाई आपल्या नातेसंबंधांना एका वेगळ्या प्रकारे पाहायला लागलीये. रिलेशनशिपमध्ये वेव्हेवलेंथ जुळली नाही तर त्यातून स्वतः या रिलेशनशिप पासून कशा प्रकारे बाहेर काढायला हवं हे या तरुणपिढीला चांगलं ठाऊक आहे.

मुंबई : सध्याच्या युगात तरुणाई आपल्या नातेसंबंधांना एका वेगळ्या प्रकारे पाहायला लागलीये. रिलेशनशिपमध्ये वेव्हेवलेंथ जुळली नाही तर त्यातून स्वतः या रिलेशनशिप पासून कशा प्रकारे बाहेर काढायला हवं हे या तरुणपिढीला चांगलं ठाऊक आहे. अशातच तुम्ही Gleeden या ऍप्लिकेशन बद्दल ऐकलंय का ? ग्लिडेन हे एक डेटिंग अ‍ॅप आहे आता हे डेटिंग ऍप्लिकेशन असल्याने साहजिक आहे हा सर्व्हे आहे रिलेशनशिप बद्दलचा. 

मोठी बातमी - महामुंबईतील 'या' क्षेत्रांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी

ग्लिडेनने भारतातील लोकं रिलेशनशिकडे कसं पाहतात, त्यांचा त्यांच्या पार्टनरच्या प्रति दृष्टिकोन कसा आहे, एक्सट्रा मॅरिटल अफेअर्स बद्दल त्यांना काय वाटतं. रिलेशनमध्ये धोका मिळाल्यानंतर ते कसा विचार करतात याबद्दल हे सर्वेक्षण करण्यात आलंय. या सर्वेक्षणात काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्यात. आपल्या पार्टनरला धोका दिल्यानंतर एखादी व्यक्ती काय करते याबाबतही काही आकडेवारी समोर आलीये. काय आहे ती माहिती आणि आकडेवारी, जाणून घेऊयात...
   
सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अशात अनेकजण ऑनलाईन डेटिंग साईटचा वापर करतायत. याच पार्श्वभूमीवर नक्की लोकांचा रिलेशनशिपबाबत कल काय आहे हे जाणून घेण्याचा या सर्व्हेमध्ये प्रयत्न करण्यात आलाय. ग्लिडेनने भारतात मुंबई पुणे दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये त्यांनी ३४ ते ३९ वयोगटातील १ हजार महिला आणि पुरूषांचं सर्वेक्षण केलं.  

मोठी बातमी - कोरोना रोखण्यासाठी मायानगरी 24 तास सुरू राहणार? वाचा ही भन्नाट आयडिया...

सर्वेक्षणातुन 'या' गोष्टी आल्यात समोर :- 

  • या सर्वेक्षणातून लॉकडाऊन संपला की ७२ टक्के लोकांनी ज्यांच्यासोबत ते ऑनलाईन चॅटिंग आणि डेटिंग करतायत त्यांना भेटण्याचं बोलून दाखवलंय. 
  • अनेकांनी आपल्याला धोका देणाऱ्यां पार्टनरला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं केलंय
  • तर काही जण आपल्या जोडीदाराला धोका दिल्यानंतरही त्याला दुसरी संधी देण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलंय 
  • यामध्ये असं देखील पाहायला मिळतंय की, आपल्या पार्टनरने धोका दिल्यावर 36.9 टक्के लोकं दुसरा पार्टनर शोधत नाहीत. धोका देणाऱ्याला देणार्याला ते माफ करून टाकतात. 

मोठी बातमी - स्थलांतरीत कामगार पुन्हा मुंबईकडे परतण्यास उत्सुक!

  • यातील ४० टक्के लोक असंही म्हणतायत की,  धोका देण्यामागचं कारण महत्त्वाचं आहे. याच कारणावर दुसरा चान्स द्यायचा का नाही किंवा त्यांचं त्यांच्या पार्टनरसोबतच भविष्य काय हे अवलंबून आहे
  • तर २३ टक्के लोकांनी धोका मिळाल्यानंतर रिलेशनशिपमधून थेट बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. 
  • 48.1 टक्के लोकांना दोन वेगवेगळ्या व्यक्तीवर प्रेम करण्यासही पसंती दिली आहे
  • तर दोन वेगवेगळ्या व्यक्तींवर प्रेम करण्यास 44.5 टक्के लोकं विरोधात आहेत.

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर याबाबद्दलची माहिती प्रकाशित करण्यात आलीये. 

what youth thinks about relationship when they are ditched check interesting facts and figures


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what youth thinks about relationship when they are ditched check interesting facts and figures