सामान्य रुग्णांसाठी वाशी रुग्णालयाचे दार उघडले; फ्ल्यु ओपीडी सुरू, टप्प्या-टप्प्याने सुविधा वाढवणार

सुजित गायकवाड
Sunday, 11 October 2020

कोरोनामुळे गेले सहा महिने सामान्य रुग्णांसाठी सुविधा बंद करण्यात आलेल्या महापालिकेच्या वाशी प्रथम सदंर्भ रुग्णालय आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

नवी मुंबई : कोरोनामुळे गेले सहा महिने सामान्य रुग्णांसाठी सुविधा बंद करण्यात आलेल्या महापालिकेच्या वाशी प्रथम सदंर्भ रुग्णालय आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ताप, थंडी, सर्दी-खोकला, मलेरिया आदी. सामान्य आजारांवर रुग्णालयात उपचार करण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. गेले आठवडाभरापासून हा विभाग सुरू केल्यानंतर दहा रुग्णांवर उपचार करून त्यापैकी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

शवागृहांत तब्बल 85 मृतदेह बेवारस; विल्हेवाट लावण्याचे BMCचे रुग्णालयांना निर्देश

महापालिकेतर्फे शहरात उभारण्यात आलेल्या रुग्णालयांपैकी वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय हे सर्वात मोठे आणि सर्व प्रकारच्या रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध असणारे एकमेव रुग्णालय आहे. तसेच या ठिकाणी गर्भवती महिलांची प्रसूती देखील केली जात होती. मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सामान्य रुग्णांसाठी उपचाराच्या सुविधा बंद करण्यात आल्या. फोफावलेल्या कोरोनामुळे वाशी रुग्णालयात फक्त कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. तत्कालिन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी वाशीचे रुग्णालय फक्त कोव्हिड रुग्णालय म्हणून वापरण्यात येईल अशी घोषणाच केली.

...तरच लोकल सुरू करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

तेव्हा पासून सहा महिने या रुग्णालयात कोव्हीडबाधित रुग्ण आणि कोव्हीड बाधित गरोदर महिलांची प्रसूती करण्यात येत होती. सामान्य रुग्णांचा आधार असणारा वाशी रुग्णालय बंद झाल्याने गरीब व गरजू रुग्णांची परवड होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे वाशीचे रुग्णालय सामान्य रुग्णांसाठीही सुरू करण्याच्या मागणीला जोर धरू लागला. आमदार गणेश नाईक यांनीही ही मागणी लावून धरली. अखेर गेल्या आठवडाभरापासून पालिकेमार्फत वाशी रुग्णालयातील काही सामान्य रुग्णांसाठी वापरण्यास प्रारंभ केला आहे. रुग्णालयात सकाळच्या सुमारास बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. रुग्णांच्या प्रमाणानुसार एका डॉक्‍टरची नियुक्त केली आहे. तसेच त्याच्या मदतीला आयुष्य योजनेतील दोन डॉक्‍टर असतात. सद्या ताप, थंडी, सर्दी-खोकला, मलेरिया-हिवताप आदी आजारांवर उपचार केले जात आहेत. तसेच या आजारांमुळे अशक्त झालेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जात आहेत.

आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती - 

टप्प्या-टप्प्याने सुविधा वाढवणार
वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात सद्या आयसीयू आणि सामान्य विभागातील रुग्ण असे एकूण 170 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी जस-जसे रुग्णांची संख्या कमी होईल तस-तसे सामान्य रुग्णांसाठी सुविधा वाढवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opened the doors of Vashi Hospital for general patients Flu OPD will start gradually increasing the facility