संकटावेळी राजकारणापेक्षा सहकार्य करावे, बाळासाहेब थोरात यांची विरोधकांकडून अपेक्षा

balasaheb thorat
balasaheb thorat

मुंबई : राज्यातील कोरोना, ऊन आणि राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य सरकार आपले कर्तव्य पूर्ण करण्यास अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील परिस्थिती बाबत चिंता व्यक्त करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच विनंती केली होती. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची संयुक्त पत्रकार परिषद आज झाली. त्यावेळी कॉंग्रेसतर्फे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि शिवसेनेतर्फे परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. 

पत्रकार परिषद सुरू झाल्यावर कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या आर्थिक निवेदनाच्या टीकेला उत्तर दिले. राज्य सरकारने मजूरांची व्यवस्था करण्याचे सर्व प्रयत्न केले. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आजही सात लाख शिवभोजनथाळींचे वितरण होत आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. मजूरांच्या तिकटांचा खर्च राज्य शासनाने केला आहे. 

मुंबईची स्थिती काळजी करण्यासारखी आहे, परंतु स्वतः मुख्यमंत्री जातीने लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आम्ही या संकटाच्या काळात विरोधी पक्षांकडून सहकार्यांची अपेक्षा केली होती. त्यांनी मात्र केवळ अराजकता आणि गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधकांनी या संकटात सरकारला सहकार्य करावे, अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com