मुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात, दरेकरांचा मुख्यमंत्र्याना टोला

सुमित बागुल
Saturday, 19 September 2020

मुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात हे काही बरोबर नाही. - दरेकर 

मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. स्वतः मुख्यमंत्री घरात राहून काम करतायत आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यावरून प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. याबाबतचा व्हिडीओ माध्यमांना देऊन प्रवीण दरेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना! शेलारांची आगपाखड

आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हणालेत प्रवीण दरेकर ? 

मुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात हे काही बरोबर नाही. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मंत्रालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू होतोय. आजही आम्ही उपाययोजनांची आणि सुरक्षेची मागणी सरकारकडे करत आहोत. माझी सरकारला विनंती आहे, आज सरकारी कारभार ज्यांच्या जीवावर चालतो तेच सुरक्षित नसतील तर ते आपल्यासाठी शोभा देणारे नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, असं विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.  

हेही वाचा : देशातील सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिका मोडणार 5 हजार कोटींच्या ठेवी

काय आहे मंत्रालयाची कोरोनाकाळातील परिस्थिती 

महाराष्ट्राचा कारभार जिथून चालतो, जिथून राज्याचा गाडा हाकला जातो त्या मंत्रालयात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळालं.  आतापर्यंत मंत्रालयातील १५ मंत्रालयीन कर्मचारी अधिकाऱ्यांचा कोरणामुळे जीव गेलाय. राजपत्रित अधिकाऱ्यांनी असा दावा केलाय. एकंदर महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता आणि मुंबईतील कोरोनाचा कमी होत असेलेला डबलिंग रेट पाहता मंत्रालयात १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याबाबत विचार करावा असा राजपत्रित अधिकारी महासंघाने म्हटलंय. 

opposition leader pravin darekar pokes cm uddhav thackeray over full attendance in mantralaya


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition leader pravin darekar pokes cm uddhav thackeray over full attendance in mantralaya