esakal | नवी मुंबईत सक्रीय रुग्णसंख्या एक हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवी मुंबईत सक्रीय रुग्णसंख्या एक हजारांवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : नवी मुंबईत (Navi Mumbai) कोरोनाच्या (Corona) दुसरी लाट ओसरत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजाराहून कमी झाली आहे. सद्यःस्थितीत महापालिका (Municipal) क्षेत्रात १ हजार ३५ सक्रिय कोरोना रुग्ण आहे. त्यामुळे शहरात कोरोना (Corona) उपचारासाठी उभारलेली सर्व काळजी केंद्रे (Center) बंद करण्यात आली असून केवळ वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रच सुरू आहे. प्रदर्शनी केंद्रातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ८० टक्केपेक्षा जास्त झाल्यास इतर काळजी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील परिस्थिती गंभीर झाली होती. दैनंदिन रुग्णांची संख्या सुमारे चौदाशेवर गेल्याने व बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली होती. ११ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक ११ हजार ६०५ रुग्ण शहरांतील १४ कोरोना काळजी केंद्रासह वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्र व नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार घेत होते. खासगी रुग्णालयांतील खाटाही भरल्‍या होत्‍या. त्यामुळे रुग्णांना खाटेसाठी प्रतीक्षेत राहावे लागत होते.

हेही वाचा: महापालिकेने घेतला 'हा' मोठा निर्णय; 44 कोटी 83 लाख रुपयांचा खर्च करणार

त्यामुळे महापालिकेने शहरातील ६,९०० खाटांची व्यवस्था वाढवून १२ हजार इतकी केली होती. त्यानंतर लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध व उपाययोजनांमुळे रुग्‍णसंख्या हळूहळू आटोक्‍यात आली. सध्या दैनंदिन रुग्णांची संख्या शंभरहून कमी आहे व बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्‍त आहे.

loading image
go to top