esakal | 'विरप्पन रस्त्यावर लुटायचा आणि हे...'; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल | Mns
sakal

बोलून बातमी शोधा

Raj and Uddhav thackeray

'विरप्पन रस्त्यावर लुटायचा आणि हे...'; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: "मुंबईकरांनी रस्त्यांच्याबाबत (Mumbai road) खूप भोगलं आहे. करदात्यांचा पैसा खड्डयात घालायचा डाव आहे का?. याबाबत आम्ही रस्त्यावर उतरून पण विरोध करू. विरप्पन रस्त्यावर लुटायचा आणि हे महापालिकेत लुटतात" अशी घणाघाती टीका मनसेचे (mns) सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी केली आहे. रस्ते, खड्डे आणि कंत्राटदाराच्या विषयावरुन संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

"संजय तुरडे आणि मी रोडचं बांधकाम केलं आहे. आता तो रोड 2 फूट खाली खचला आहे. त्याबाबत जनआंदोलन केलं. अधिकारी काहीच रिस्पॉन्स करत नाहीत. याबाबत मी न्यायालयात गेलो आहे" असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा: समीर वानखेडेंवर पोलिसांचा वॉच नाहीय - गृहमंत्री

"अनधिकृत काम मोठ्याप्रमाणात सुरू आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेले गद्दार लोक पण आहेत. त्यावेळी कमिशनर पण तोंड बंद करून बसलेत. अनधिकृत गोष्टींना पाठिंबा देण्याचा हा डाव आहे का?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

हेही वाचा: मला वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे : फडणवीस

"शिवसेनेवर काय जादू केली या कंत्राटदारांनी माहीत नाही, पण यांच्या प्रेमासाठी शिवसेनेने मुंबईकरांना खड्यात टाकलं आहे. चोऱ्या करायच्या म्हणून कंत्राटदारांची जलद बैठक घेत आहेत" असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. "चीफ इंजिनियरने कारवाई नाही केली तर आम्हाला करावी लागेल. 227 नगरसेवक आहेत त्यातील एक आमचा आहे. आधी 226 नगरसेवकांचा काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ, मग आम्ही रस्त्यावर आहोतच" असं देशपांडे म्हणाले.

loading image
go to top