

Mumbai Police Probe Pakistan Call
Esakal
Mumbai News: वांद्रे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या गरीब नगर इथं दीड महिन्यापूर्वी पश्चिम रेल्वेनं अतिक्रमण विरोधी कारवाई केली. या परिसरात असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. यात अनेक घरं, लहान दुकानं, धार्मिक स्थळं यांचाही समावेश होता. दोन दिवस चाललेल्या या कारवाईमुळे तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. दरम्यान, या सगळ्या प्रकाराला महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतर आता मुंबई पोलिसांना धमकी देणारे फोन येत आहेत. बुधवारी थेट पाकिस्तानमधून एक फोन आल्यानं खळबळ उडालीय.