esakal | पालघर गारगाव गटावर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा
sakal

बोलून बातमी शोधा

जल्लोष करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी  उमेदवार रोहिणी शेलार

पालघर : गारगाव गटावर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

sakal_logo
By
दिलीप पाटील

पालघर : तालुक्यातील सर्वात महत्वाच्या समजल्या जाणा-या गारगाव गटावर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला झेंडा फडकवला आहे. ही निवडणुक शिवसेनेने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेचे अनेक नेते येथे ठाण मांडून बसले होते.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वांना धोबी पछाड देत ही जागा कायम राखली आहे. गारगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी शेलार, शिवसेनेच्या निलम पाटील व भाजपच्या करूणा वेखंडे रिंगणात होते.

मात्र भाजपने ऐनवेळी निवडणूकीच्या आदल्या दिवशी माघार घेतल्याने भाजप स्पर्धेतून बाद झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आमनेसामने उभे ठाकले होते.शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे ,पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार रविंद्र फाटक हे या गटात विशेष लक्ष ठेवून होते तर आमदार शांताराम मोरे व ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील हे या गटात ठाण मांडून बसले होते. मतदार संघातील प्रत्येक गावात घर टु घर प्रचार हे करत होते.

हेही वाचा: वाशिम 'ZP' वर महाविकास आघाडीचा झेंडा, वंचितच्या जागा घटल्या

भाजपच्या उमेदवाराला ऐनवेळी माघार घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्यात शिवसेना यशस्वी ठरली होती. मात्र मतदारांनी शिवसेनेला झिडकारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात आपली मते टाकली.

आमदार दौलत दरोडा यांच्या विधानसभेमध्ये गारगाव हा भाग येत असून दौलत दरोडा यांनी ही निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. दरोडा यांचे स्वीय सहाय्यक रोहिदास शेलार यांच्या पत्नी रोहिणी शेलार या निवडणुकीत रिंगणात उतरल्या होत्या.त्यामुळे राष्ट्रवादीला पराभूत करण्याचा चंगच शिवसेनेच्या नेत्यांनी बांधला होता. मात्र शिवसेनेची ही रणनिती असफल होऊन रोहिणी शेलार या एक हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याने शिवसेनेला चांगलीच चपराक बसली आहे.

loading image
go to top