वाशिम 'ZP' वर महाविकास आघाडीचा झेंडा, वंचितच्या जागा घटल्या

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi e sakal

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत (washim zp election 2021) एकूण १४ जागांसाठी निवडणूक होती. त्याचे पूर्ण कल हाती आले असून महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) याठिकाणी झेंडा रोवला आहे. १४ पैकी एकूण ८ जागांवर महाविकास आघाडीने सत्ता काबिज केली आहे. तसेच भाजपला मागच्या निवडणुकीत होत्या तितक्याच जागा मिळाल्या असून वंचितच्या तीन जागा घटल्या आहेत.

Mahavikas Aghadi
नागपुरात भाजपला मोठा धक्का, बावनकुळेंचे कट्टर समर्थक पराभूत
Mahavikas Aghadi
ZP Election 2021 : नागपुरात सुनील केदारांचा वरचष्मा, भाजपला तगडी टक्कर
Mahavikas Aghadi
Live : नागपुरात काँग्रेस विजयी, भाजपचा सुपडासाफ

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 14 जागा रिक्त केल्या होत्या. या जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामधे रिसोड तालुक्यातील कवठा जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे वैभव सरनाईक विजयी झाले. त्यांनी जनविकास आघाडीचे स्वप्निल सरनाईक यांचा पराभव केला. पोटनिवडणुकीआधी हा गट जनविकास आघाडीकडे होता. गोभणी गटातून जनविकास आघाडीच्या पूजा भूतेकर यांनी आपली जागा कायम राखली. त्यांनी काँग्रेसच्या रेखा उगले यांचा पराभव केला. भरजहागीर गटामधे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित पाटील विजयी झाले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अमित गरकळ यांचा पराभव केला. ही जागा वंचित बहुजन आघाडीने गमावली. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे गटातून वंचीत बहुजन आघाडीच्या लक्ष्मी लहाने विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला उंडाळ यांचा पराभव केला. याआधी रत्नमाला उंडाळ वंचीत बहुजन आघाडीच्या सदस्य होत्या. मंगरुळपिर तालुक्यातील दाभा गटात राष्ट्रवादी काॅग्रेसचे राजेश राठोड विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान सदस्य दिलीप मोहनावाले यांचा पराभव केला. कंझरा गट राष्ट्रवादी काँग्रेसने कायम राखला. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता कोठाळे यांनी शिवसेनेच्या प्रतिभा मुखमाले यांचा पराभव केला. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या आसेगाव गटात ठाकरे यांनी विजय कायम केला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सुभाष राठोड यांचा पराभव केला. कारंजा तालुक्यातील भामदेवी गटातून वंचीत बहुजन आघाडीच्या वैशाली लळे विजयी झाल्या. शिवसेनेच्या ज्योती उगले यांचा पराभव केला. वाशीम तालुक्यातील काटा गट शिवसेनेने गमावला या गटातून काॅग्रेसचे संध्या देशमुख विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या ललिता खानझोडे यांचा पराभव केला. पार्डीटकमोर गटात अपक्ष सरस्वती चौधरी विजयी झाल्या त्यांनी काॅग्रेसचे विठ्ठल चौधरी यांचा थोड्या फरकाने पराभव केला. उकळीपेन गटात शिवसेनेचे सुरेश मापारी यांनी वंचीत बहुजन आघाडीचे दत्तराव गोटे यांचा पराभव करत ही जागा वंचीत बहुजन आघाडीकडून खेचून घेतली. मानोरा तालुक्यात फुलउमरी गटात भाजपच्या सुरेखा चव्हाण विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशा राठोड यांचा पराभव केला. तळप गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा गावंडे यांनी जागा कायम राखत काॅग्रेस च्या रजनी गावंडे यांचा पराभव केला. कुपटा गटातून भाजपचे उमेश ठाकरे पुन्हा विजयी ठरले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत पाटील यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक पाच जागा जिंकून अध्यक्षपदावर दावा कायम केला आहे.

वाशिम जिल्हा परिषद : (विजयी)

निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14

1) काटा : सौ. संध्याताई देशमुख : कॉंग्रेस

2) पार्डी टकमोर : सौ. सरस्वती मो. चौधरी : अपक्ष

3) उकळी पेन : सुरेश मापारी : शिवसेना

4) आसेगांव : चंद्रकांत ठाकरे : राष्ट्रवादी

5) कंझरा : सुनिता कोठाडे : राष्ट्रवादी

6) दाभा : आर. के. राठोड : राष्ट्रवादी कॉंग्रेस

7) फुलउमरी : सुरेखा चव्हाण : भाजप

8) कुपटा : उमेश ठाकरे : भाजप

9) तळप : शोभा सुरेश गावंडे : राष्ट्रवादी

10) कवठा : वैभव सरनाईक : कॉंग्रेस

11) गोभणी : सौ. पूजाताई भुतेकर : जनविकास

12) भर जहागिर : अमित खडसे : राष्ट्रवादी

13) पांगरी नवघरे : सौ. लक्ष्मी सुनिल लहाने : वंचित

14) भामदेवी : सौ. वैशाली लळे : वंचित

एकूण जागा : 14

निकाल जाहीर : 14

वंचित : 02

अपक्ष : 01

शिवसेना : 01

राष्ट्रवादी : 05

भाजप : 02

काँग्रेस : 02

जनविकास : 01

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com