'पालघरमधील चित्र महाराष्ट्रात दिसेल'; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विश्वास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

  • पालघर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर 1.3 टक्के इतका आहे. ही गोष्ट नक्कीच समाधानकारक असून पालघर जिल्ह्यामधील हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
  • पालघर जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर 1.3 टक्के इतका आहे. ही गोष्ट नक्कीच समाधानकारक असून पालघर जिल्ह्यामधील हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

ही बातमी वाचली का? VIDEO! बोरिवलीतील इंद्रप्रस्था शॉपिंग सेंटरला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल

 
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कोव्हिड 19 ची सद्यस्थिती, आरोग्यविषयक सुविधा आदींबद्दल विस्तृत माहिती बैठकीत दिली. पालघरमध्ये औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. नागरिकांनी ताप आणि ऑक्सिजनची पातळी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. कोरोनाची लागण झालीच तर घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, असे आव्हाड म्हणाले.

ही बातमी वाचली का? शाब्बास! धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे WHO कडून कौतुकाची थाप

आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कुठेही निधी कमी पडू देणार नाही, असे आव्हाड यांनी सांगितले. जिल्ह्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची कमतरता नाही. जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटरशिवाय कोणी रुग्ण मृत्युमुखी पडेल अशी वेळ येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

-----------------------------

(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like Palghar corona mortality in Maharashtra will be reduced, Trust Housing Minister Dr. Jitendra Awhad