ShivSena
ShivSenaesakal

पालघर : जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीत सेनेला फटका

तर वसई मध्ये बविआच्या विजयाने सत्ता परिवर्तन

विरार : पालघर तालुका पंचायत समितीच्या एकूण 9 गणा पैकी सेना 4 गणात भाजप 2 बविआ 1 राष्ट्रवादी काँग्रेस 1 मनसे 1 विजय मिळविला आहे. मात्र शिवसेनेने मागच्या निवडणुकीत सहा गणात विजय प्राप्त केला होता यावेळी मात्र सेनेच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी मात्र भाजपाने दोन जागा सेनेच्या खेचून आणले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या निवडणुकीच्या वेळी एकही जागा नव्हती यावेळी मात्र सेनेची एक जागा राष्ट्रवादीने पटकावली तर सेनेने मागची अपक्षांची जागा पटकावली. पालघर तालुक्यातील शिवसेनेच्या गटबाजीमुळे दोन जागा सेनेला गमवावे लागले आहेत. या निवडणुकीत वसई पंच्यायत समितीमध्ये बविआच्या विजयाने सत्तेची समीकरनेच बदलली आहेत.

पालघर पंचायत समितीच्या नऊ गणातील विजयी उमेदवार नवापूर गण राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद वडे यांना 1561 मते तर शिवसेनेचे भरत पिंपरी यांना 1475 मते राष्ट्रवादीचे मिलिंद वडे हे 86 मताधिक्याने निवडून आले. सालवड गण भाजपाच्या मेघा पाटील यांना 1822 मते तर सेनेच्या तनुजा राऊत यांना 1377 मते मिळाली व 445 मताधिक्याने भाजपाच्या मेघा पाटील निवडून आल्या सरावली अवध नगर गणात सेनेच्या ममता पाटील यांना 1769 तर भाजपाच्या निर्मिती संख्ये यांना 1156 मते मिळाली व ममता पाटील या 613 मताधिक्क्याने निवडून आल्या सरावली गणात भाजपाच्या रेखा सकपाळ यांना 1253 तर सेनेच्या वैभवी राऊत यांना 1072 मते मिळाली व भाजपाच्या रेखा सपकाळ 181 मताधिक्याने निवडून आल्या.

ShivSena
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

मान गणात मनसेच्या तृप्ती पाटील 2327 तर अपक्ष उमेदवार मीनाक्षी सांबरे यांना 1269 मते मिळाली व मनसेच्या तृप्ती पाटील 1058 मताधिक्क्याने निवडून आल्या मनसेने ही जागा राखून ठेवली आहे. मागच्या वेळीही या जागेवर मनसेचा उमेदवार निवडून आला होता मनसेने आपले अस्तित्व राखून ठेवले आहे.

शिगाव खुताड या गणात बविआ चे अनिल काठ्या यांना 1732 तर सेनेच्या निधी बांदिवडेकर यांना 1640 मते मिळाली व अनिल काट्या हे 92 मताधिक्याने निवडून आले. बराणपुर गणात सेनेचे किरण पाटील यांना 2748 तर बविआ चे दीपेश पावडे यांना 1578 मते मिळाली व सेनेचे किरण पाटील 1170 मताधिक्याने निवडून आले कोंढाणा गण सेनेचे कमळाकर अधिकारी यांना 3288 तर काँग्रेसचे संजय अधिकारी यांना 2541 मते मिळाली व सेनेचे कमळाकर अधिकारी 747 मताधिक्याने निवडून आले. नवघर घाटीम गणात सेनेच्या कामिनी पाटील यांना तीन हजार 598 मध्ये तर बविआ च्या प्रमिला पाटील यांना 2944 मते मिळाली व सेनेच्या कामिनी पाटील 654 मताधिक्याने निवडून आल्या.

पालघर तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या पोट निवडणुकीत सेना भाजपा बहुजन विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट या पक्षाने निवडणुका लढविल्या होत्या मात्र काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट यांना एकही जागा मिळाली नाही. त्यात मागच्या निवडणुकीत हे काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.आताही काँग्रेसचे अस्तित्व पणाला लागल्याचे दिसून आले.

ShivSena
वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला

वसई पंच्यायत समितीत शिवसेनेला धक्का, बविआच्या विजयाने सत्ता बदलणार

वसई तालुका पंच्यायात समितीच्या पॉट निवडणुकीत दोन जागांवर बविआने विजय मिळविल्याने या ठिकाणी सत्तापरिवर्तन होऊन बविआची सत्ता येणार असल्याने बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ओबीसींच्या मुद्यावरून न्यायालयाने पालघर जिल्हा परिषडेच्या १५ आणि आणि पंच्यायत समितीच्या १४ जगासाठी काळ निवडणूक झाली होती. या निवडणुकीची मतमोजणी आज होऊन निकाल बाहेर आले. यात वसई पंच्यायत समितीच्या दोन जगावर बविआने विजय मिळविल्याने पंच्यायत समितीमध्ये असलेली भाजप युतीची सत्ता गेली आहे. या निवडणुकीत भाताने गणातून अशोक पाटील यांना ३०४७ मते मिळाली तर शिवसेनेचे विद्यमान सदस्य आनंद पाटील यांना २६८२ मते मिळाली. तर तिल्हेर गणातून गीता पाटील यांना या निवडणुकीत लॉटरी लागली आहे.

निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर त्यांनी शिवसेना सोडून बविआ मध्ये प्रवेश केला होता. बविआ नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना तिकीट दिले आणि त्या विजयी झाल्या त्यांना २१५६ मते मिळाली तर शिवसेनेच्या प्रतीक्षा पाटील याना १४५७ मते मिळाली असून या ठिकाणी गीता पाटील या विजयी झाल्या. यापूर्वी पंच्यायत समितीवर बविआची सत्ता होती परंतु महानगर पालिका झाल्यावर त्यात बदल झाला होता. निवडणुकी पूर्वी भाताने आणि तिल्हेर या दोन्ही जागा शिवसेने कडे होत्या, परंतु या निवडणुकीत त्या दोन्ही जागा बविआने घेतल्याने पंच्यायत समिती मधील सेनेच्या जागा कमी होऊन त्यांच्याकडे एक जागा राहिली आहे तर भाजप कडे २ जागा राहिल्या आहेत.

ShivSena
अमरावती : अंबामातेच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात

८ जागांच्या पंच्यायत समितीती बविआ कडे आता ५ जागा झाल्याने पंच्यायत समितीमध्ये बविआची निर्विवाद सत्ता आली आहे. या निवडणुकी नंतर बोलताना बविआचे जेष्ठ नेते नारायण मानकर यांनी सांगितले कि आमचे काम बोलते. कोरोनाच्या काळातही बविआचे कार्यकर्ते सतत नागरिकांच्या बरोबर होते. हे त्याचेच फळ आहे. या पुढे महानगरपालिका आणि पंच्यायत समितीच्या माध्यमातून तालुक्याचा चान्गला विकास करण्याचे ध्येय आमदार ठाकूर यांनी ठेवले आहे.

डहाणू पंचायत समितीच्या ओसरवीरा गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती विपुल राऊत यांना 2774 मते मिळाली त्यामुळे त्या 994 मताधिक्क्याने विजयी झाल्या तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सुवर्णा बिपीन तल्हा यांना 1663 मते मिळाल्याने त्यांना पराभव पतकरावा लागला.तर सरावली गणात अजय गुजर भाजप यांना १९५५ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी माकपचे महेंद्र मर्यायांना १५५१ इतकी मते मिळून ते ४०४ मतांनी विजयी झाले

वाडा पंचायत समितीच्या सापने बुद्रुक गण यावेळी शिवसेनेने मनसेकडून हिसकावून घेतला आहे. शिवसेनेच्या दिष्टी मोकाशी या निवडून आल्या आहेत. त्यांना 2897 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मनसेच्या कार्तिकी ठाकरे यांना 2656 मते मिळवून पराभवाला सामोरे जावे लागले.

पालघर जिल्ह्यातील विविध पंच्यायत समिती मध्ये झालेली पोट निवडणुकीचे निकाल

शिवसेना ५,भाजप ३, बविआ ३,राष्ट्रवादी काँग्रेस २ , मनसे १ एकूण जागा १४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com