रोजगार देण्यात 'पालघर' जिल्हा राज्यात 'प्रथम', इतक्या हजार आदिवासी कुटूंबांना मिळाले काम

manarega
manarega
Updated on

पालघर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आदिवासींना रोजगार देण्यात पालघर जिल्हा राज्यात प्रथमस्थानी पोहचला आहे. मनरेगा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यात 2020-21 या वर्षात एप्रिल 2020 पासून आतापर्यंत 39 हजार 541 कुटुंबातील 80 हजार 50 मजुरांना कामे देण्यात आली आहेत. यापैकी 36 हजार 736 आदिवासी कुटुंब असून सर्वाधिक आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात पालघर जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे.

मनरेगा अंतर्गत एकूण 2 हजार 548 कामे सुरू असून त्यावर एकूण 60 हजार 461 मजूर काम करत आहेत. पालघर जिल्ह्यात शेल्फवर 12 हजार 288 कामे आहेत. यापैकी 9 हजार 9 कामे ग्रामपंचायत स्तरावरील असून 3 हजार 279 कामे यंत्रणा स्तरावरील आहेत. मनरेगा योजनेंतर्गत 2020-21 या वर्षात एप्रिल 2020 पासून 1900.08 लाख इतका निधी मजुरांच्या मजुरीसाठी देण्यात आलेला आहे. एप्रिल 2020 पासून केंद्र सरकारने मजुरीच्या दरामध्ये हे वाढ केली असून महाराष्ट्रासाठी हा दर यंदा 238 रुपये आहे. 

मनुष्यदिन निर्मितीत तिसरा क्रमांक
मनुष्यदिन निर्मिती या वर्षात एप्रिल 2020 पासून आतापर्यंत 8 लाख 29 हजार 726 इतकी मनुष्यदिन निर्मिती झालेली आहे. मनुष्यदिन निर्मितीमध्ये पालघर जिल्हा राज्यात तिसरा क्रमांकावर आहे

मनरेगा योजनेंतर्गत नियमानुसार मजुरांना मजुरी 15 दिवसांच्या आत देण्यात येते, मात्र पालघर जिल्ह्यात मजुरांना आठ दिवसांच्या आत मजुरी दिली जाते. मजुरी दिल्याचे  प्रमाणही 100 टक्के आहे.
- दीपक चव्हाण, उपजिल्हाधिकारी, मनेरेगा

Palghar district is the first state in the state to provide employment to so many thousands of tribal families

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com