Mumbai Rain: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पूरस्थितीमुळे २ जणांचा मृत्यू, तर २४४ जणांची सुटका; बचावकार्य सुरू

Palghar Rain: पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. तसेच पावसामुळे २ जणांचा मृत्यू झाला असून २४४ जणांची सुटका झाल्याची माहिती आहे.
Palghar Heavy Rain

Palghar Heavy Rain

ESakal

Updated on

पालघर : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. पालघरमध्ये अनेक भागात नदी नाल्यांना पूर आले असून रस्ते देखील जलमय झाले आहेत. सततचा पाऊस आणि पूरसदृश परिस्थितीत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com