

Palghar Earthquake
ESakal
पालघर : मागील चार दिवसांपासून मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही अनेक सखोल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांवर संकट ओढवले असताना आता भूकंपाचे धक्केही बसल्याची माहिती समोर आली आहे.