Thane News: पालघरमधील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ, आठ दिवसांपासून धंदा बंद; नेमकं कारण काय?

Palghar Rickshaw Drivers: गेल्या काही दिवसांपासून पालघरमधील कसा गावात रिक्षा चालकांचा व्यवसाय ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
Rickshaw Drivers
Rickshaw DriversESakal
Updated on

कासा : पालघर जिल्ह्यातील कासा गावात गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका रिक्षा चालकांवर बसत असल्याचे दिसून येत आहे. सीएनजी पंपावर वीज पुरवठा खंडित असल्याने रिक्षा चालकांना आठ-आठ तास रांगेत उभे रहावे लागत आहे. मात्र त्यानंतरही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षा चालकांचा धंदा होत नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com