esakal | पालघर : पावसाचा भातपिकाला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पालघर : पावसाचा भातपिकाला फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे दहा दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात वरसलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले होते. त्यतून शेतकरी सावरतच होता तोच गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीचा पाऊल पालघर जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहे.

संध्याकाळच्या सुमारास जोरदार वारा आणि गडगडाटासह पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीमध्ये पाणी साचले असून कापणीला आलेले भातपीक आडवे झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २ हजार ६८५ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यातील एकूण लागवडीपैकी सुमारे आठशे हेक्टर क्षेत्रात भात पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी जाहीन नोटीस तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे सरावली, तालुका भिवंडी, जिल्हा सकाळी पर्यंत मनोर मंडळ क्षेत्रात ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: कोल्हापूर - रविवारी कॅन्डल मार्च तर सोमवारी जिल्हा बंद

नुकसानीची पाहणी

सोमवारी सायंकाळी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी पालघर तालुक्यातील बहाणपूर, आंबेदे आणू नानिवली भागात नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. नुकसान झालेल्या भातशेतीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना उपस्थित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

loading image
go to top