

Palghar Fourth Mumbai
ESakal
मनोर/कासा : पालघर जिल्हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे 'ग्रोथ इंजिन' बनणार आहे, असे सांगत 'चौथी मुंबई' म्हणून जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर दौऱ्यावेळी व्यक्त केला. येथे बनणाऱ्या देशातील पहिल्या 'ऑफशोर एअरपोर्ट'च्या उभारणीसाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.