३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेली पंखुडी कोट्यवधींच्या कंपनीची मालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेली पंखुडी कोट्यवधींच्या कंपनीची मालक

22 व्या वर्षी तिने स्टार्ट अपची सुरुवात केली, कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या कंपनीची मालकीण झाली पण वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.

३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेली पंखुडी कोट्यवधींच्या कंपनीची मालक

नवी दिल्ली - वयाच्या २२ व्या वर्षी स्टार्ट अप सुरु करणाऱ्या पंखुडी श्रीवास्तव (Pankhuri Shrivastava) हिचे कार्डियाक अॅरेस्टनं ३२ व्या वर्षी निधन झालं. महिलांसाठी काम करणारी सोशल कम्युनिटी पंखुडी (Pankhuri) आणि रेंटल स्टार्टअप ग्रॅबहाऊसची (Grabhouse) ती संस्थापक होती. एक वर्षापूर्वी तिचं लग्नही झालं होतं. २ डिसेंबरला पतीसोबतचा फोटो शेअर करून तिने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. कमी वयात पंखुडीने मोठी झेप घेतली होती. २०१२ मध्ये तिने ग्रॅबहाऊसची स्थापना केली होती. याला २०१६ मध्ये क्विकरने खरेदी केलं. त्यानंतर पंखुडीने २०१९ मध्ये पंखुडी हा महिलांसाठीचा प्लॅटफॉर्म लाँच केला.

पंखुडीचे वडिल एका बँकेत मॅनेजर आहेत. तर पंखुडीने तिचं दहावीपर्यंतचं शिक्षण झाशीतील सेंट फ्रान्सिस इंटर कॉलेजमधून केलं होतं. त्यानंतर भोपाळमध्ये राजीव गांधी विद्यापीठातून बीटेकचं शिक्षण घेतलं. पुढे ती मुंबईला तिची स्वप्न घेऊन आली होती. देशातील सर्वात मोठी वुमन इंटरप्रेन्योर बनायची तिची इच्छा होती. मुंबईत आल्यानंतर तिने टीच फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला होता. यातून तिने मुंबईत महानगरपालिकेच्या शाळांमध्येही शिकवण्याचं काम केलं होतं.

लोकांना घर शोधण्याासाठी इतके कष्ट घ्यायला लागू नयेत यासाठी तिने २० हजार रुपये खर्च करून ग्रॅबहाऊसची सुरुवात केली. या कंपनीची कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल होती. पंखुडीच्या माध्यमातून महिलांसाठी लाइव्ह इंटरअॅक्टिव्ह कोर्स, तज्ज्ञांशी चर्चा यातून सामाजिकरण, शोध, कौशल्य विकास यासाठी मदत केली जाते. पंखुडीने सिकोइया कॅपिटल इंडियाच्या स्टार्टअप अॅक्सलेटर प्रोग्रॅमच्या माध्यमातून ३.२ मिलियन डॉलर गोळा केले होते.

हेही वाचा: शहनाज गिलच्या वडिलांवर गोळीबार; हल्लेखोर पसार

उत्तर प्रदेशच्या झाशी शहरातून पंखुडी मुंबईत आली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा तिने पहिल्यांदा मुंबईत पाऊल टाकलं तेव्हा अनेक अडचणी तिच्यासमोर होत्या. राहण्याचं ठिकाण शोधण्यापासून सुरुवात करायची होती. पहिल्या दोन वर्षात तर तिला पाच वेळा फ्लॅट बदलावे लागले. यावेळी ब्रोकर्सना मोठी रक्कम द्यावी लागली. मुंबईत आलेल्या अनुभवातून तिच्या डोक्यात कंपनी सुरु करण्याची कल्पना सुचली.

Web Title: Pankhuri Shrivastava Cardiac Arrest Reason Behind Death Know About Pankhuri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai
go to top