Panvel Mayor: पनवेल महापालिकेला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर, 'या' उमेदवाराचा अर्ज दाखल

Panvel Municipal Corporation: पनवेल महापालिका महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामुळे पनवेल महापालिकेला पहिला आगरी समाजाचा महापौर मिळणार असल्याचे समोर आले आहे.
Panvel Municipal Corporation

Panvel Municipal Corporation

ESakal

Updated on

पनवेल : पनवेल महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी नितीन जयराम पाटील, तर उपमहापौरपदासाठी प्रमिला रविनाथ पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज पनवेल महापालिका कार्यालयात नगरसचिव नानासाहेब कामठे यांच्याकडे सादर केले. नितीन पाटील यांच्या निवडीमुळे आगरी समाजाचा पहिला महापौर लाभणार असून, ही बाब समस्त आगरी समाज आणि पनवेलसाठी ऐतिहासिक ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com