
पनवेल : महापालिकेने नागरिकांसाठीच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक, सुलभ करण्यासाठी ‘किओस्क’ पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे महत्त्वाची कागदपत्रे, कर भरणा, तक्रारी नोंदविणे आणि विविध सेवांचा लाभ क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने पालिकेच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याला पूर्णविराम लागणार आहे.