esakal | CCTV च्या मदतीने रेल्वे पोलिसांनी वर्षभरात शोधली ३० हरवलेली मुले | Railway police
sakal

बोलून बातमी शोधा

 CCTV footage

CCTV च्या मदतीने रेल्वे पोलिसांनी वर्षभरात शोधली ३० हरवलेली मुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : पनवेल रेल्‍वे स्‍थानकातील (panvel railway station) सीसीटीव्हीच्या (CCTV) साहाय्याने वर्षभरात हरवलेल्या ३० बालकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात रेल्वे पोलिसांनी (Railway police) यश आले आहे. याशिवाय चार ज्‍येष्‍ठ नागरिकांनाही सुखरूप कुटुंबीयांकडे पोहोचण्यासाठी मदत झाली आहे.

हेही वाचा: सिडकोकडून बाजारात १४ भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे रेल्वे स्थानकात घडणारे गुन्हे काही प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. अनेकदा घरच्यांवर रागावून अथवा इतर कारणाने घर सोडून बाहेर पडलेले अथवा प्रवासा दरम्यान चुकामूक झालेल्‍या लहानग्यांचा शोध लावणे देखील सीसीटीव्हीमुळे सोपे झाले आहे. पनवेल रेल्वे स्थानक, खांदेश्वर, खारघर तसेच मानसरोवर रेल्वे स्थानकात एकूण १२८ कॅमेऱ्यांच्या मदतीने आरपीएफ तसेच जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी वाट चुकलेल्या ३१ लहानग्यांना ताब्यात घेतले आहे. पैकी ३० जणांना घरच्यांच्या हवाली केले आहे. तर वर्षभरात रेल्वे स्थानक परिसरात सापडलेल्या ५ ज्‍येष्ठ नागरिकांपैकी २ महिला व २ पुरुषांना देखील त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले आहे.

हेही वाचा: वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

१५५ गुन्हे दाखल

आरपीएफ आणि जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने कलम ३९२ अंतर्गत जबरी चोरीच्या वर्षभरात दाखल करण्यात आलेल्या १५५ गुन्ह्यांपैकी ६६ गुन्ह्यांची उकल केली आहे. ज्यात आरपीएफने ५७ तर जीआरपीने ९ गुन्ह्यांची उकल केली आहे.

रेल्‍वे संपत्तीची चोरी

रेल्वेच्या संपत्तीची चोरी केल्याबाबत ४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.


पनवेल रेल्वे स्थानकातून नजर

पनवेल, खांदेश्वर तसेच मानसरोवर रेल्‍वे स्थानकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद होणाऱ्या चित्रीकरणावर नजर ठेवण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आली आहे. या कक्षातून कर्मचारी २४ तास सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्वत्र नजर ठेवून असतात.

loading image
go to top