esakal | रिटघर गावात 'एक गाव एक गणपती'; गाव जोपासतेय ४७ वर्षांची परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

'एक गाव - एक गणपती'

रिटघर गावात 'एक गाव एक गणपती'; गाव जोपासतेय ४७ वर्षांची परंपरा

sakal_logo
By
वसंत जाधव

नवीन पनवेल : पनवेल (Panvel) तालुक्यातील रिटघर गावात (Ritghar village) एक गाव गणपतीची (Ganpati festival) प्रथा १९७५ सालापासून गेली ४७ वर्ष निरंतर जोपासली जात आहे. या गावातील गणेशोत्सव गावाच्या एकोप्याचे (Unity in village) प्रतिक समजले जाते. पनवेल तालुक्यातील आगरी बहुल लोकवस्ती असलेल्या काळुंद्रे नदीच्या (kalundre river) बाजूला वसलेले निसर्गरम्य गाव. या गावाने 'एक गांव एक उत्सवाच्या' माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे.१९७५ साली पडलेल्या दुष्काळामुळे गावातील काही जाणकार मंडळींनी अवाजवी खर्चाला फाटा देत एक गाव एक गणपती ची संकल्पना मांडली, अस्तित्व आणली जोपासली व वाढवली ती आजतागायत.

हेही वाचा: अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत कट ऑफ कायम

गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत किंवा गल्लोगल्ली. जिथं-तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. त्यात आता कोरोनाचं सावट. तरी या कोरोनाच्या सावटाखाली पनवेल तालुक्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली. मात्र, एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते.

अशीच एक गाव एक गणपतीची संकल्पना पनवेल तालुक्यातील एका गावानं गेल्या ४७ वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे. गेल्या ४७ वर्षांपासून रिटघर गावातील सर्व समाजाचे महिला, पुरुष आणि अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोस्तव, सार्वजनिक गौरी उस्तव, नवरात्रोउत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे ४७ वे वर्ष असून ह्या गावाची ४०० घरे असून लोकसंख्या १८०० च्या आसपास आहे. दरवर्षी गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते. ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे.

हाच आदर्श ह्या गावानं जोपासला आहे. कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन सर्व उत्सव साजरे करतात. मात्र, कोरोना संकटामुळे या गावातील मोठ्या प्रमाणावर साजर्या होणार्या सर्व कार्यक्रमावर गावकऱ्यांनी स्थगिती दिली आहे. यंदाही कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन साधेपणाने बाप्पाला विराजमान करण्यात आले. विशेष म्हणजे गावातील तरुण एकत्र येवून डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात. येथे बनविण्यात येणारी आरासही इको फ्रेंडली असते. ह्या वर्षी प्लास्टिक बंदी च्या अनुषंगाने देखावा तयार करून बाप्पांला विराजमान केलं आहे.

loading image
go to top