
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा तापला आहे. मराठी विरुद्ध हिंदी असा वाद अनेकदा झाल्याचं दिसून आलंय. राज्यात फडणवीस यांच्या सरकारनं त्रिभाषा धोरण शाळांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यानंतर फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेत त्रिभाषा धोरण लागू करण्याचा निर्णय मागे घेतला होता. दरम्यान, मराठी विरुद्ध हिंदी असा वाद अधेमधे उफाळून येतो. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पनवेलमधला हा व्हिडीओ असून यात मराठी बोलण्याचा आग्रह करताच भडकलेल्या हिंदी भाषिकाने मरेपर्यंत मराठी बोलणार नाही असं सांगितलं.