esakal | परमबीर सिंग यांचं निलंबन तडकाफडकी होणार नाही | Parambir singh
sakal

बोलून बातमी शोधा

parambir singh

परमबीर सिंग यांचं निलंबन तडकाफडकी होणार नाही

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) परदेशात निघून गेल्याची चर्चा आहे. ते कुठे आहेत, या बद्दल काहीच माहिती नाहीय, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip wlase patil) यांनी काल सांगितलं. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान परमबीर सिंग यांना तडकाफडकी निलंबित करण्यात येणार नाही. परमबीर सिंग यांच्या निलंबनाबाबत राज्य सरकारने सावध भूमिका घेतली आहे.

राज्य सरकार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निलंबनाची प्रक्रिया सुरू करणार आहेत. परमबीर प्रकरणी एकीकडे चांदीवाल आयोगाची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील परमबीर सिंग यांनी दिलेले नाही.

हेही वाचा: आनंदराव अडसुळांच्या अडचणी वाढणार? दिलासा देण्यास 'HC'चा नकार

त्यामुळे परमबीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार अशी सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा: चादरीच्या आत पट्टीमध्ये ड्रग्ज, NCB ची मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

काँग्रेसचा भाजपावर आरोप

"परमबीर सिंग देशाबाहेर पळून गेले असतील, तर निश्चित यामध्ये भाजपाचा हात आहे. त्यांना पळून जाण्यासाठी भाजपानेच मदत केलीय" असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. परमबीर सिंग यांना वाचवणे, त्यांना पाठिंबा देणे हाच भाजपाचा अजेंडा असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय.

loading image
go to top