काय आता शाळेत ठेवणार कोरोना रुग्ण ? पालकांना समजताच पालकांनी घेतली ही भूमिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या संघर्षात मदत करण्यासाठी शैक्षणिक संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. शैक्षणिक संस्था आपल्या संस्थेच्या इमारती क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी सरकारला देत आहेत. त्यापैकीच एक सांताक्रूझ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलची इमारत ही क्वारंटाईन सेंटर म्हणून देण्यात आली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची जागा क्वारंटाईन सेंटरला देण्यासाठी विरोध केला आहे.

यासंदर्भात स्थानिक नगरसेवकानं महापालिकेला पत्र पाठवलं आहे. या पत्रानंतर महापालिकेनं या शाळेत क्वारंटाईन सेंटर बनवण्याची सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. या पत्राला महापालिकेनं स्पष्टिकरण दिलं आहे की, गरज भासल्यास या क्वारंटाईन सेंटरसंबंधी पुन्हा विचार केला जाईल. या शाळेत 300 हून जास्त बेड्स राहतील इतकी या जागेची क्षमता आहे. 

महामारीतही 'या' कंपन्यांमध्ये आहे नोकरीच्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळतेय बढती आणि बोनसही

काही पालकांनी असा आरोप केला आहे की, शाळेनं त्यांना या योजनेला विरोध दर्शवून व्यवस्थापनाच्या बाजूनं उभे रहाण्यास सांगितलं आहे. काहीचं म्हणणं असं आहे की, शाळेच्या इमारतीत क्वारंटाईन सेंटर उभारल्यास परिसरात संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.

स्थानिक रहिवाशांपैकी एक पालक म्हणाले की, शाळा आमच्या जंक्शनपासून अगदी जवळ आहे. जिथे आमच्यापैकी बरेचजण जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तिथे जात असतात. जर तिथे क्वारंटाईन सेंटरची सुविधा केल्यास ती धोकादायक ठरु शकेल. 

एका पालकानं आरोप केला आहे की, आम्हाला याबाबतची माहिती शाळेतून मिळाली. अनौपचारिकरित्या ही माहिती पालकांपर्यंत पोहोचली. हे स्पष्टपणे म्हटलं आहे की विशेषत: स्थानिक रहिवासी आणि पालक पुढे आल्यास या योजनेस विरोध केला जाऊ शकतो. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास या योजनेस नकार देण्यासाठी शाळेनं पालकांचा वापर केला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनो सर्वात मोठी बातमी, BMC म्हणतेय...

स्थानिक नगरसेवक हितल गाला यांनी सोमवारी पालिकेला पत्र लिहून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची विनंती केली. आम्ही संपर्क साधल्यानंतर महापालिकेनं सेंटर उभारण्याची प्रक्रिया स्थगित केली असून आमचे आमदार आशिष शेलार यांनी आम्हाला याबद्दल पाठिंबा दिला आहे. 

अनेक कॉल आणि मेसेज करुनही पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना लुल्ला यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही आहे. एच-वेस्ट प्रभाग अधिकारी विनायक विसपुते यांनी स्पष्टीकरण दिले की याचा अर्थ असा नाही की शाळा ताब्यात घेतली जाणार नाही. जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा त्यावर विचार केला जाऊन ती ताब्यात घेतली जाईल. 

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ हरीश शेट्टी म्हणाले की, वैज्ञानिकदृष्ट्या, स्थानिक भागात क्वारंटाईन सेंटर किंवा आपल्या जवळपास कोविड -19 चे रुग्ण असल्यास एखाद्याला कोरोना व्हायरसचा थेट संसर्ग होण्याची शक्यता नसते. मात्र भीतीमुळे लोकं अशा परिस्थितीत त्या गोष्टींना विरोध करतात.

parents opposes for converting school into quarantine center in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parents opposes for converting school into quarantine center in mumbai