esakal | महामारीतही 'या' कंपन्यांमध्ये आहे नोकरीच्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळतेय बढती आणि बोनसही
sakal

बोलून बातमी शोधा

महामारीतही 'या' कंपन्यांमध्ये आहे नोकरीच्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळतेय बढती आणि बोनसही

कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग आर्थिक संकटांचा सामना करतय तेव्हा भारतात अशा काही कंपन्या आहेत ज्यांचा व्यवसाय मात्र या काळात तेजीत आला आहे.

महामारीतही 'या' कंपन्यांमध्ये आहे नोकरीच्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळतेय बढती आणि बोनसही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग आर्थिक संकटांचा सामना करतय तेव्हा भारतात अशा काही कंपन्या आहेत ज्यांचा व्यवसाय मात्र या काळात तेजीत आला आहे. या कंपन्यांनी आता मोठ्या प्रमाणात नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शिक्षण, रियल इस्टेट स्टार्टअप उद्योगांचा समावेश आहे. यातील काही कंपन्या तर नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यासोबतच आपल्या कर्मचाऱ्यांना बढती आणि पगारवाढ देखील देणार आहेत.

तुम्हाला घर भाड्याने किंवा विकत घ्यायचे असेल तर तुम्ही सहाजिकच नो-ब्रोकर डॉट कॉमवर कधीतर गेलाच असाल. याच कंपनीने आता १०० नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती दिली आहे. शिवाय ते आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि बढती देखील देणार आहेत. कंपनीचा विस्तार वाढविण्यासाठी नवी भरती करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात देखील करण्यात आली असून यात मार्केटींग, बिझनेस, ऑपरेशन्स आणि तात्रिक विभागात जागा भरण्यात येणार आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना ही कंपनी बोनस देखील जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत असून नवीन भरती करण्यात येणाऱ्यांमध्ये चार ते पाच वर्षे कामाचा अनुभव असणाऱ्यांनी प्राधान्य देण्यात येणार आहे. 

शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील सर्वात 'मोठी' बातमी, सहकार विभागाने सुरु केली 'ही' प्रक्रिया

बाजारात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असून आम्हाला आमचा बाजारातील हिस्सा वाढवायचा आहे, असे मत नो-ब्रोकर डॉट कॉमचे सहसंस्थापक तसेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अखिल गुप्ता यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांतील महामारीच्या कठीण काळातही या स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून एप्रिल महिन्यात या कंपनीने ३० दशलक्ष डॉलर उभारले आहेत. 

केविन भारती मित्तल यांनी स्थापन केलेल्या हाईक या घरगुती इंटरनेट स्टार्टअप कंपनीने देखील पुढच्या काही आठवड्यांमध्ये बाहेरुन काम करु शकणाऱ्या २० पेक्षा अधिक नवीन जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या कंपनीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या काही तरुण उमेदवारांना देखील नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या स्टार्टअप कंपन्यांकडून दिले जाणारे पगाराचे आकडे देखील बाजारातील बड्या कंपन्यांच्या आकड्यांशी स्पर्धा करणारे आहेत. नो-ब्रोकर डॉटकॉमच्या मते ते चांगल्या पेमास्टर्सपैकी एक आहेत आणि त्यांच्याकडील नवख्या उमेदवाराचे वेतन सहा लाखांपासून सुरु होते आणि त्या व्यक्तीच्या अनुभवानुसार ते ४० ते ५० लाखांपर्यंत जाते. 

रेल्वेचे रिझर्वेशन काउंटर्स आजपासून सुरु, कोणत्या स्टेशनवर किती काउंटर सुरु? वाचा संपूर्ण यादी...

याशिवाय ऑनलाईन क्लासेसच्या मागणीत होत असलेली वाढ लक्षात घेता या क्षेत्रातही मोठी भरती होण्याची शक्यता आहे. नोएडा येथील क्लासप्लसने देखील आपले संख्याबळ वाढवायला सुरुवात केली असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील भरती करणात येत आहे. अपग्रॅड, सिम्पलीलर्न, युडेमी यांसारख्या कंपन्या देखील जवळपास तीन हजार नव्या नोकऱ्या तयार करण्याच्या तयारीत आहेत.

in pandemic these companies are providing job offers employees are getting promotions as well 

loading image