

Youth nearly fell in gap between running train
ESakal
मुंबई : धावती लोकल पकडताना अनेक अपघात होत असल्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना मुंबईत जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर घडली आहे. एक तरुण धावती लोकल पकडत असताना अचानक तोल जाऊन ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत पडता-पडता वाचला. तरुण पडत असल्याचे पाहताच काही आरपीएफ जवानांनी त्याला वाचवले. या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.