Navi Mumbai: हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय; मानसरोवर स्थानक ठरतंय त्रासदायक
Manasarovar Station: हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकावर अशुद्ध पाणी, आसन व्यवस्था अशा अनेक समस्या सुरु आहेत. यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास त्रासदायक होत आहे.
कामोठे : हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकाला गैर सुविधांनी वेढले आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकातील अनियमित चालणारे इंडिकेटर, पाणपोईचे अशुद्ध पाणी, अपुऱ्या आसन व्यवस्थेमुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास त्रासदायक होत आहे.