मुंबई महापालिकेच्या 'त्या' निर्णयामुळे डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचे हाल

dialysis
dialysis

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. डायलिसिसचे जे रुग्ण उपचारासाठी मुंबईतल दाखल झाले आहेत. त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. कारण हे सर्व रुग्ण देशातल्या आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झाले. मात्र महापालिकेच्या आदेशानुसार सोमवारपासून बऱ्यापैकी खासगी रुग्णालयातली 80 टक्के बेड्स हे कोविड-19 च्या रुग्णांसाठी राखीव असणार आहेत. यामुळे डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होणार आहेत. 

काही रुग्णालयं यापुढे डायलिसिसची प्रक्रिया सुरू ठेवू शकणार नाहीत. महानगरपालिकेच्या निर्णयामुळे आम्हाला मोठा फटका बसणार आहे. बहुतेक रुग्णालये अन्य रूग्णांना प्राधान्य देत आहेत आणि इतर रूग्णालयातील रुग्णांना चाचणीच्या प्रक्रियेतून जावं लागतं असल्याचं चेंबूरच्या रहिवासी सुधा हरिहरन यांनी सांगितले. सुधा या सुराणा सेठिया हॉस्पिटलमध्ये आठवड्यात डायलिसिससाठी जात होत्या.

चेंबूरमध्ये असलेल्या रुग्णालयानं डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांना जवळपास 45 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सानपाडा येथील ब्रान्चमध्ये जाण्यास सांगितलं आहे. 

हरिहरन पुढे म्हणाल्या की, यापैकी बर्‍याच रुग्णांना तीव्र मूत्रपिंडाचा त्रास आहे. काही रुग्णांना मधुमेह तर काही ज्येष्ठ नागरिक रुग्णही यात आहेत. त्यातील काही एकटे राहतात आणि जवळच्या रुग्णालयात जाण्यासाठीची सोयीसुविधा करतात. लॉकडाऊनमुळे आधीच परिस्थिती अवघड आहे आणि त्यात आता ती आणखीनच गंभीर झाली आहे.

चेंबूर रुग्णालय सोमवारपासून कोविड रुग्णालयात रूपांतरित होणार असल्याचं स्पष्टिकरण सुराणा सेठिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिन्स सुराना यांनी दिलं आहे. रूग्णालयातील 45 खाटांपैकी 25 खाजगी रूग्णांसाठी राखीव असतील. तर एका आठवड्याभरात, संपूर्ण रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेवा देईल. डॉ. सुराणा म्हणाल्या की, केवळ कोविड -19 पॉझिटिव्ह असलेल्या डायलिसिस रूग्णांनाच त्यांचे डायलिसिस युनिट वापरण्यास परवानगी दिली जाईल.

घाटकोपर पूर्वेतील रहिवासी ज्यांची पत्नी, डायलिसिस रूग्ण आहे ज्या कोविड- 19  पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. आता त्या उपचार घेऊन घरी परतल्या आहे. त्यांना उपचारादरम्यानचा आमचा अनुभव शेअर केला आहे. जेव्हा तिची कोविड-19ची चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आम्हाला अनेक रुग्णालयाचे दरवाजे ठोठावे लागले. त्यातच तिला आठवड्यात डायलिसिसही आवश्यक आहे. रुग्णालयाची सुव्यवस्था एकदम भयंकर होती, असं रुग्णाच्या पतीनं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. मला असं वाटतं की,  COVID-19 रुग्णालयात डायलिसिसच्या रूग्णांना मदत केली जावी.

दरम्यान, जे रुग्ण शहरातील अन्य डायलिसीस केंद्रांना भेट देतात त्यांना बीएमसीच्या निर्णयाबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी जूनपासून खार येथे राहणारे आणि आठवड्यातून तीन वेळा हिंदुजा हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी जाणारे जितू शेनॉय (56) यांनी सांगितलं की, डायलिसिसची सुविधा दुसऱ्या केंद्रात हलवण्यात आलं असल्याची रुग्णालयानं मला काही कल्पना दिलीच नाहीच.

कोविड-19च्या सर्व रूग्णांना अनुदानित उपचार देण्याचे काम करणारी राज्य सरकारची प्रमुख योजना असल्याचं डॉ. सुधाकर शिंदे, आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (MJPJAY),यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयाच्या 80 टक्के बेड्स रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय ही योग्य दिशेने सरकारची वाटचाल आहे. सर्व खासगी रुग्णालये आता सरकारी दरांप्रमाणे रूग्णांकडून शुल्क आकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आम्ही खाजगी रुग्णालयांसाठी सुधारित खर्चाचे काम यापूर्वीच केलं आहे. उदाहरणार्थ, आयसीयूसाठी यापूर्वी पंचतारांकित रुग्णालयातून दररोज सुमारे 50 हजार आकारले जात असेल तर आम्ही त्याच दिवसाचा दर दिवसाचा दर 7 हजार  केला आहे. व्हेंटिलेटरसाठी, जेथे ते आर 60,000 घेतले जात होते, सरकारनं तो दर कमी करुन 9 हजार केला आहे. खासगी रूग्णालयात सर्वसाधारण प्रभागाचे शुल्क देखील दररोज 4 हजार इतके असल्याचं डॉ. शिंदे यांनी सांगितलं आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुढे म्हणाल्या की, MJPJAY जे लोकसंख्येच्या 85 टक्के लोकांना (पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना) कॅशलेस आणि मोफत आरोग्य विमा योजनेचा लाभ देतात, ते उर्वरित श्वेत शिधापत्रिकाधारकांपर्यंत वाढवण्यात येतील. आपल्या सर्व नागरिकांना मोफत आणि कॅशलेस आरोग्य विमा प्रदान करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

patients who came for dialysis are in trouble in mumbai read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com