Student Suicide : पवई आयआयटीत बी. टेकच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पवई आयआयटीत बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहात रविवारी आत्महत्या केल्याची घटना नोंदवण्यात आली.
suicide
suicidesakal

मुंबई - पवई आयआयटीत बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहात रविवारी आत्महत्या केल्याची घटना नोंदवण्यात आली आहे. मुंबईच्या आयआयटी पवईत शिक्षण घेणाऱ्या एका ,18 वर्षीय विद्यार्थ्याने आपले जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हा विद्यार्थी वसतिगृहात रहात होता. आयआयटी पवईच्या वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने आयआयटी परीसरात खळबळ माजली आहे. पवई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केली आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन सोलंकी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने आयआयटी पवईच्या वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दर्शन सोलंकी हा मूळचा अहमदाबादचा राहणारा होता. आयआयटी पवईत बी.टेक मेकॅनिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता.

दर्शन तीन महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी मुंबईतील आयआयटीत दाखल झाला होता. कोणतीही सुसाईड नोट पोलिसाना मिळाली नाही. दर्शनने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नाही. दर्शनची कालच सहामाही परीक्षा संपली होती. त्यानंतर आज रविवारी दर्शनने टोकाचं पाऊल उचललं. पवई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com