...अन्‌ पाहता पाहता कंपनी जळून खाक!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

सीवूड्स येथील सी-होम्स इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पावणे औद्योगिक वसाहतीमधील "मोरया ग्लोबल' या रासायनिक कंपनीला गुरुवारी (ता.13) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

नवी मुंबई : सीवूड्स येथील सी-होम्स इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पावणे औद्योगिक वसाहतीमधील "मोरया ग्लोबल' या रासायनिक कंपनीला गुरुवारी (ता.13) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. रात्री उशिरापर्यंत या आगीचे लोळ परिसरात दिसून येत होते. कंपनीत रसायने असल्याने सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, संपूर्ण कंपनी जळून मोठे नुकसान झाले आहे. 

ही बातमी वाचली का? कर्नाळा बँकेवर ठेवीदारांचा मोर्चा

आगीची घटना समजताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ही आग इतकी प्रचंड होती की, तिला विझवण्यासाठी पावणेव्यतिरिक्त रबाळे, नेरूळ औद्योगिक वसाहत; तसेच नवी मुंबई महापालिकेच्या सात अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होते. कंपनीत रसायने असल्याने तब्बल पाच तासांनंतर आग आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अजून अस्पष्ट आहे. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून, मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पावणे एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? महाड आगाराचे वेळापत्रक कोलमडले

सीवूड्स रहिवासी इमारतीला आग 
नवी मुंबईत मागील काही दिवसांसापासून आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात सीवूड्स येथील सी-होम्स येथील इमारतीला आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणताना व बचाव कार्य करताना अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in pawane MIDC Chemical Company Fire navi mumbai