पायल घोष 'यु टर्न'; रिचा चड्ढाची बिनशर्त माफी मागण्यास तयार
पायल घोष 'यु टर्न'; रिचा चड्ढाची बिनशर्त माफी मागण्यास तयार

पायल घोषचा 'यु टर्न'; रिचा चड्ढाची बिनशर्त माफी मागण्यास तयार

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्‍यपवर आरोप करताना अभिनेत्री रिचा चड्ढाचा उल्लेख केल्याबद्दल अभिनेत्री पायल घोष बिनशर्त माफीनामा दाखल करण्यास तयार आहे, असे पायलच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आज सांगितले. 

रिचाने पायल विरोधात न्यायालयात 1.1 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावर आज न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे दुरचित्रसंवादाद्वारे सुनावणी झाली. पायलसह दिग्दर्शक कमाल खान विरोधातही रिचाने हा दावा केला आहे. या प्रकरणात केलेले विधान मागे घेण्यास पायल तयार आहे. याशिवाय ती बिनशर्त दिलगिरीही व्यक्त करीत आहे. रिचाचा उल्लेख अनवधानाने झाला, असे पायलच्या वतीने ऍड. नितीन सातपुते यांनी न्यायालयाला सांगितले. याबाबत दोन्ही पक्षकारांशी चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. 

सोमवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने सर्व पक्षकारांना रिच्यासंबंधी कोणत्याही पोस्ट समाजमाध्यमांवर टाकण्यास अंतरिम मनाई केली आहे. 2013 मध्ये अनुराग कश्‍यपने लैंगिक अत्याचार केले असा आरोप पायलने समाजमाध्यमांद्वारे केला. हा तपशील कमाल खानने ही प्रसिद्ध केला होता. तर याशिवाय एका युट्यूब वाहिनीने तो प्रसारित केला होता. यामध्ये रिचाचा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने घेण्यात आला आहे. याविरोधात रिचाने सर्व संबंधीतांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. 
------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com